The writer who started the return of the award also donated for the construction of Shriram Temple

अवॉर्ड वापसीची सुरुवात करणाऱ्या साहित्यिकानेही श्रीराम मंदिर निर्माणासाठी दिले दान

हिंदीचे प्रख्यात साहित्यिक उदय प्रकाश यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरस्कार वापसीची सुरुवात करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. उदय प्रकाश यांनी सन 2015 मध्ये कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर साहित्य अकादमी अवॉर्ड परत केला होता. The writer who started the return of the award also donated for the construction of Shriram Temple


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : हिंदीचे प्रख्यात साहित्यिक उदय प्रकाश यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. पुरस्कार वापसीची सुरुवात करण्यासाठी त्यांना ओळखले जाते. उदय प्रकाश यांनी सन 2015 मध्ये कन्नड साहित्यिक एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर साहित्य अकादमी अवॉर्ड परत केला होता.

The writer who started the return of the award also donated for the construction of Shriram Temple

उदय प्रकाश यांनी दान दिल्याची माहिती आपल्या एका फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. त्यांनी राम मंदिरासाठी 5 हजार 400 रुपए दिले. यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. आपल्या कम्युनिस्ट विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या साहित्यिकाने राम मंदिरासाठी दान दिल्याने त्यांचे इतर कॉम्रेड साथींपुढे ते आता हिंदू कम्युनल घोषित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

The writer who started the return of the award also donated for the construction of Shriram Temple

यानिमित्त अवॉर्ड वापसी करणाऱ्यांनी आता खरी घरवापसी केल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*