पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेते, शिवसेनेची तात्विक राजकारणालाच तिलांजली, एकाच पक्षाकडे महापौरपद आणि विरोधी पक्षनेतेपदही

स्थानिक स्वराज्य संस्थेच्य मुळ हेतूला आणि तात्विक राजकारणालाच शिवसेनेकडून तिलांजली देण्याचा प्रकार जळगाव महापालिकेत घडला आहे. पत्नी महापौर आणि पती विरोधी पक्षनेते आणि दोघेही शिवसेनेच असा प्रकार जळगाव महापालिकेत घडला आहे.The wife is the mayor while the husband is the Leader of the Opposition.


विशेष प्रतिनिधी

जळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थेच्य मुळ हेतूला आणि तात्विक राजकारणालाच शिवसेनेकडून तिलांजली देण्याचा प्रकार जळगाव महापालिकेत घडला आहे. पत्नी महापौर आणि पती विरोधी पक्षनेते आणि दोघेही शिवसेनेच असा प्रकार जळगाव महापालिकेत घडला आहे.

शिवसेनेने सत्तेसाठी आत्तापर्यंत अनेक कोलांडउड्या मारल्या आहेत. मात्र, महापौरपद आणि विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे ठेऊन या पक्षाने राजकारणातील तत्वालाच तिलांजली दिली आहे.भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या असून, त्यांचे पती सुनील महाजन हे विद्यमान विरोधी पक्षनेते आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापौरपद पत्नीकडे, तर विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जुळून आला आहे.

विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.

२०१८मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे सुनील महाजन विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे.

The wife is the mayor while the husband is the Leader of the Opposition.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*