शरजील उस्मानीच्या पाठिशी ठाकरे – पवार सरकारमधील दोन मंत्र्याचा हात; भाजपचा गंभीर आरोप; मंत्र्यांच्या नावांवरून सोशल मीडियात जोरात चर्चा!!

वृत्तसंस्था

मुंबई : हिंदूंना सडका म्हणणाऱ्या शरजील उस्मानीच्या पाठिशी ठाकरे – पवार सरकारमधील दोन मंत्र्यांचा हात आहे. शरजीलला पाताळातून शोधून काढू, असे मुख्यमंत्री म्हणतात, ते पाताळ सोडा तो पुण्यात आला. मुंबईत राहिला.The two ministers in thackeray – pawar govt supported sharjeel usmani to fled from mumbai

मुंबईतून त्याला ग्रीन चॅनेल दोन मंत्र्यांनीच दिला, असा गंभीर आरोप भाजपचे नेते आमदार आशिश शेलार यांनी केला आहे.शरजीलच्या मागे हात असणारे हे दोन मंत्री कोण… याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. शरजीलने पुण्याती एल्गार परिषदेत येऊन हिंदूना सडक्या मेंदूचे असल्याची अश्लाघ्य टीका केली होती. एल्गार परिषदेनेही त्याचे समर्थन केले होते.

हेच ते शर्जिलचे वादग्रस्त वक्तव्य…


याविषयी पत्रकार परिषदेत आशिश शेलारांनी ठाकरे पवार सरकारला घेरले. शेलार म्हणाले, की “पाताळाची चर्चा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना तो शरजील पुण्यात आला, हे माहिती नव्हते का? माध्यमांमधून माहिती समोर येत आहे.

आम्ही त्याही वेळेला म्हटले होतं की, हिंदूंना सडक्या मनोवृत्तीचा म्हणणारा, हिंदू विरोधी बोलणारा आणि हिंदू धर्माचा अपमान करणारा शरजील इथल्या भाषणानंतर पळून कसा गेला? त्या भाषणानंतर काही दिवस तो मुंबईत होता.

त्याला मुंबईतून बाहेर जाण्यासाठी ग्रीन चॅनल कुणी दिला? सरकारमधील कोणत्या मंत्र्यांनी दिला? त्या ग्रीन चॅनलमधून त्याला पळवण्याचा मार्ग खुला कुणी केला? त्यानंतर आज परत रेड कार्पेट कुणी टाकला? आमचा आरोप आहे की सरकारमधील दोन मंत्र्यांचा या मागे हात आहे.

त्या दोन मंत्र्यांचे कामच हिंदू विरोधी कुणी काही म्हटले तर त्याचे समर्थन आणि प्रदर्शन करण्याचे आहे. हिंदू धर्माला कुणी शिव्या दिल्या की या ठाकरे – पवार सरकारमध्ये बसलेल्या दोन मंत्र्यांच्या मनात उकळ्या फुटतात आणि मग दबावाचे राजकारण मुख्यमंत्री कार्यालयाकडे येते का? असा संशय बळावतो.”

शेलार यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे – पवार सरकारमधले हे मंत्री कोण… याची चर्चा सुरू झाली आहे. हिंदू विरोधी वक्तव्ये कोण देते… कोण आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी हिंदू विरोधी भूमिका घेते… याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

The two ministers in thackeray – pawar govt supported sharjeel usmani to fled from mumbai

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*