वृत्तसंस्था
पुणे : नूतन आर्थिक वर्षात 11 टक्के करवाढ लागू कर करण्याचा आयुक्तांचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने फेटाळून लावला आहे. त्यामुळे कोरोना आणि त्यातुन निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे पिचलेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.The tax crisis on Punekar was averted
आर्थिक वर्ष 2021-2022 साठी आयुक्त विक्रमकुमार यांनी 11 टक्के करवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत तो फेटाळण्यात आला आहे.
सर्वसाधारण करात साडेपाच टक्के, सफाई करात साडेतीन टक्के आणि मलनिस्सारण करात 2 टक्के करवाढ करण्याचा प्रस्ताव होता. त्याद्वारे पालिकेच्या उत्पन्नात 130 कोटीने वाढ होईल, असा अंदाज होता. परंतु, तो फेटाळून लावल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.