बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळचे गोड हास्य हवेत विरले; मनसेने शिवसेनेला “वीरप्पन गँग” संबोधले; राजकीय लढाई सुरू


विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळचे सर्वपक्षीय पुढाऱ्यांच्या चेहऱ्यावरचे गोड हास्य विरले आहे… मनसेने शिवसेनेला वीरप्पन गँग संबोधून मुंबई महापालिका निवडणूकीच्या लढाईला तोंड फोड़ले आहे. The sweet smile of the unveiling of Balasaheb’s statue vanished into thin air

मनसेने मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेची तुलना वीरप्पन गँगशी केली आहे. ‘वीरप्पनने जेवढे लोकांना लुटले नसेल, त्यापेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांनी महापालिकेला लुटले आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करावाच लागेल,’ असे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे.मुंबईसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी आज मनसेची महत्त्वाची बैठक मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये होणार आहे. या बैठकीला मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांनाही या बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. मागच्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुखापत झाल्यामुळे ही बैठक आटोपती घेण्यात आली होती. आज होणाऱ्या बैठकीत पदाधिकाऱ्यांवर जबाबदारीचे वाटप, पक्षवाढीसाठी नवीन योजना, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आंदोलन अशा स्वरुपाची रणनीती आखली जाणार आहे.

महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. काहीच दिवसांपूर्वी भाजप नेते प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यामुळे या चर्चांनी पुन्हा जोर धरला या पार्श्वभूमीवर मनसेच्या आजची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

The sweet smile of the unveiling of Balasaheb’s statue vanished into thin air

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था