स्टॅच्यू ऑफ युनिटी बनतेय आंतरराष्टीय पर्यटन केंद्र, ५५३ दिवसांत पन्नास लाख पर्यटकांनी दिली भेट

जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येने पन्नास लाखांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ ५५३ दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे हे  आंतरराष्टीय पर्यटन केंद्र बनले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. The Statue of Unity, an international tourist destination, was visited by 50 lakh tourists in 553 days.


विशेष प्रतिनिधी

गांधीनगर : जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देणाºया पर्यटकांच्या संख्येने पन्नास लाखांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ ५५३ दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे हे  आंतरराष्टीय पर्यटन केंद्र बनले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून स्टॅच्यू ऑफ युनिटीला पन्नास लाख पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती दिली आहे. आंतरराष्टीय पातळीवरील हे महत्वाचे पर्यटन केंद्र बनले असल्याचेही पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. 

जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे  पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा पाहण्यासाठी लाखो लोकांनी हजेरी लावली आहे.

या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन एन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे पर्यटकांना रिव्हर राफ्टिंग, इको-टुरिझम, जंगल सफाई आदींसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर’ साकारण्यात आले आहे. ‘व्हॅली आफ फ्लॉवर’ हे 250 एकरच्या विस्तीर्ण परिसरात साकारण्यात आलं असून त्यामध्ये तब्बल 102 प्रजातीची झाडं लावण्यात आली आहेत. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या प्रेक्षक गॅलरीतून परिसर नयनरम्य दिसावा यासाठी याची निर्मिती करण्यात आली आहे. 

The Statue of Unity, an international tourist destination, was visited by 50 lakh tourists in 553 days.

 
 

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*