हरियाणाच्या जिंदमध्ये राकेश टिकैत उभे राहिलेले महापंचायतीचे स्टेज कोसळले

वृत्तसंस्था

जिंद : शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत आणि भारतीय किसान युनियनचे अन्य शेतकरी नेते उभे असलेले शेतकरी महापंचायतीचे स्टेज शेतकरी नेत्यांच्या वजनाचा भार सहन न झाल्याने कोसळले.The stage on which Bharatiya Kisan Union (Arajnaitik) leader Rakesh Tikait & other farmer leaders were standing, collapses in Jind, Haryana.

स्टेज कोसळले त्यावेळी महिला मोठ्या प्रमाणावर स्टेजजवळ बसलेल्या होत्या. स्टेज कोसळताच तेथे अफरातफरी माजली. परंतु काही वेळातच परिस्थिती शेतकरी नेत्यांनी काबूत आणून महापंचायत सुरू केली.

दिल्ली बॉर्डरवरील आंदोलन चालू ठेवून भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत जिंदमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारने तीनही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी केली होती. महापंचायतीत तसा ठराव मंजूर करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते.

त्यानुसार टिकैत महापंचायतीच्या ठिकाणी पोहोचले. त्यांच्या समवेत भारतीय किसान युनियनचे अन्य नेते होते. ते सगळे स्टेजवर चढले. त्यांचा भार वाढला. त्यमानाने स्टेज छोटे आणि कमी क्षमतेचे केले होते.

शेतकरी नेत्यांच्या स्वागताचा कार्यक्रम सुरू असतानाच नेत्यांचा भार स्टेजला सहन झाला नाही आणि ते कोसळले. स्टेज कोसळताच समोर बसलेल्या महिला उठल्या. तिथे काही काळ अफरातफरी माजली. पण लवकरच शेतकरी नेत्यांनी परिस्थिती काबूत आणून महापंचायत सुरू केली. कृषी कायद्यांच्या मुद्यावर मोदी सरकारवर त्यात टीकास्त्र सोडण्यात आले.

The stage on which Bharatiya Kisan Union (Arajnaitik) leader Rakesh Tikait & other farmer leaders were standing, collapses in Jind, Haryana.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*