The price of 3 quintals of wheat should be equal to 10 Gram gold, said Rakesh Tikait

3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळे सोन्याएवढी असावी, राकेश टिकैट म्हणाले MSPसाठी लागू व्हावा हा फॉर्म्युला

कृषी कायदे मागे घेण्यासाठी आणि किमान आधारभूत किंमती (एमएसपी) या मागणीसाठी आंदोलन करणारे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, सरकारने एमएसपीसाठी त्यांचे वडील महेंद्र टिकैत यांचे सूत्र अंमलात आणले पाहिजे. यानुसार 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याइतकीच असावी, असे ते म्हणाले. The price of 3 quintals of wheat should be equal to 10 Gram gold, said Rakesh Tikait


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कृषी कायदे मागे घेण्यासाठी आणि किमान आधारभूत किंमती (एमएसपी) या मागणीसाठी आंदोलन करणारे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे की, सरकारने एमएसपीसाठी त्यांचे वडील महेंद्र टिकैत यांचे सूत्र अंमलात आणले पाहिजे. यानुसार 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याइतकीच असावी, असे ते म्हणाले. तथापि, 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत सुमारे 48 हजार रुपये आहे, तर गव्हाचे समर्थन मूल्य 1975 रुपये प्रति क्विंटल आहे.

‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, त्यांनी एमएसपीसंदर्भात त्यांचे वडील महेंद्रसिंग टिकैत यांचे सूत्र अंमलात आणले पाहिजे. ते म्हणाले, “1967 मध्ये भारत सरकारने गव्हाचे एमएसपी 76 रुपये प्रतिक्विंटल निश्चित केली, त्यावेळी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे पगार दरमहा 70 रुपये होते. एका महिन्याच्या पगारात ते 1 क्विंटल गहू खरेदी करू शकत नव्हते. एक क्विंटल गहूच्या किमतीतून अडीच हजार विटांची खरेदी व्हायची. त्या काळी फक्त 30 रुपयांत 1 हजार विटा घेता यायच्या.”राकेश टिकैत म्हणाले की, त्यावेळी सोन्याचा भाव प्रति तोळे 200 रुपये होता, ही किंमत तेव्हाच्या 3 क्विंटल गव्हाबरोबर होती. ते म्हणाले, “आता आम्हाला तीन क्विंटल गव्हाच्या बदल्यात 1 तोळे सोने द्या. इतर वस्तूंचे भाव जसे वाढलेत तसेच गव्हाचेही वाढले पाहिजेत.

मग गव्हाची किंमत काय असेल?

सोन्याच्या किमतीशी तुलना केली, तर टिकैत यांच्या मागणीनुसार 1 क्विंटल गव्हाची किंमत तब्बल 16 हजार रुपये होईल, जी सध्याच्या एमएसपीपेक्षा 8 पट जास्त आहे. त्यानुसार एक किलो गव्हाची किंमत तब्बल 160 रुपये होईल.

The price of 3 quintals of wheat should be equal to 10 Gram gold, said Rakesh Tikait

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, राकेश टिकैत हे कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीसाठी संघर्ष करत आहेत. ते सरकारकडे एमएसपीबाबत कायदा करण्याची मागणी करत आहेत. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर गाझीपूर सीमेवर संभाव्य पोलीस कारवाईपूर्वी टिकैत यांनी अश्रू ढाळून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळवली होती. आता टिकैत आंदोलनाचा मुख्य चेहरा बनले आहेत.

The price of 3 quintals of wheat should be equal to 10 Gram gold, said Rakesh Tikait

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*