महाराष्ट्रात विकास नसून वसूली, देशमुखांचा राजीनामा घेतला तरच शरद पवारांची विश्वासार्हता प्रस्थापित होऊ शकेल, रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे, तो विकास नसून ती वसूली आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. The only way by which Shrad Pawar credibility can be restored is resignation of Anil Deshmukh, Union minister Ravi shankar Prasad cautioned


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे, तो विकास नसून ती वसूली आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना शरद पवार नेमक्या कोणत्या कारणामुळे अनिल देशमुख यांना पाठिशी घालत आहेत? असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.

रवीशंकर प्रसाद म्हणाले, हा महाराष्ट्र शो नेमकं कोण चालवत आहे? हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात कन्फ्युज सरकार आहे का? या वसूलीत आघाडीची राजकीय दिशा काय आहे? शरद पवार अनिल देशमुखांना पाठिशी का घालत आहेत? अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल्.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुखांवर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. शरद पवारांनी मात्र दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. त्यावरून आता विरोधकांच्या टीकेचा रोख अनिल देशमुखांसोबतच शरद पवारांच्या दिशेने देखील वळू लागला आहे.

भाजपाचे नेते सुनिल देवधर यांनीही ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त म्हणाले की, शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे, अनिल देशमुख प्रकरणात हे पुन्हा एकदा समोर आले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी त्यांना उघडे पाडले. उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची, असं म्हणत करावे तसे भरावे.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात देशमुखांकडून वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले; परंतु माझ्याकडे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार ५ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशमुख हे नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्या रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे.

शरद पवार यांच्या या दाव्यानंतर काल पवारांना योग्य ब्रिफिंग देण्यात आले नाही. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली आणि देशमुखांना प्रोटेक्ट केले गेले, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच यामुळे ते एक्सपोझ झाले आहेत. मला वाटते, की देशमूख हे १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या दाव्यानंतर आता भाजपाचे नेते सुनिल देवधर यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

The only way by which Shrad Pawar credibility can be restored is resignation of Anil Deshmukh, Union minister Ravi shankar Prasad cautioned

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*