पश्चिम बंगालमध्ये एकच माफिया इंडस्ट्री सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

केंद्राच्या योजनांची अमलबजावणी केली तर लोक मोदींना आशीर्वाद देतील असं दीदींना वाटते. दीदी, जर तुम्हाला मोदींनी क्रेडिट द्यायचं नाही तर नका देऊ पण गरिबांचा हक्क का हिरावून घेता? येथे अनेक उद्योग मरणावस्थेत आहेत. फक्त एकच इंडस्ट्री सुरु आहे ती म्हणजे माफिया इंडस्ट्री अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. The only mafia industry in West Bengal, Prime Minister Narendra Modi’s attack on Mamata Banerjee


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : केंद्राच्या योजनांची अमलबजावणी केली तर लोक मोदींना आशीर्वाद देतील असं दीदींना वाटते. दीदी, जर तुम्हाला मोदींनी क्रेडिट द्यायचं नाही तर नका देऊ पण गरिबांचा हक्क का हिरावून घेता? येथे अनेक उद्योग मरणावस्थेत आहेत. फक्त एकच इंडस्ट्री सुरु आहे ती म्हणजे माफिया इंडस्ट्री अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.


ममतादीदींनी नंदीग्राममध्ये घेतली चक्क चार भाड्याची घरे, सुवेंदू अधिकारींच्या पराभवासाठी उतरल्या रणांगणात


बंगालमध्ये प्रचार सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल करताना मोदी म्हणाले, बंगालमध्ये ज्या पद्धतीने लोकांचं समर्थन मिळत आहे ते पाहता यावेळी राज्यात भाजपा सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट आहे. तुम्ही सर्व इतक्या मोठ्या संख्येने भाजपाला आशीर्वाद देण्यासाठी आलात हे माझं भाग्य आहे. यावरुन बंगालमध्ये यावेळी भाजपाचं सरकार येणार हे स्पष्ट आहे. बंगालने काँग्रेस, टीएमसी, डावे सर्वांना संधी दिली आहे. जर तुम्ही भाजपाला संधी दिली तर खरं परिवर्तन कसं असतं हे आम्ही दाखवून देऊ.

काँग्रेस आणि डाव्यांनी केलेला विनाश तुम्ही पाहिलात. टीएमसीने तुमच्या स्वप्नांचा चुराडा केला. गेल्या ७० वर्षात तुम्ही प्रत्येकाला संधी दिलीत. पण आम्हाला पाच वर्ष द्या. आम्ही बंगालला ७० वर्षांच्या विनाशातून मुक्त करु. तुमच्यासाठी आमच्या जीवाचं बलिदान देऊ. बंगालसाठी जर खऱ्या अथार्ने एखादा पक्ष असेल तर तो भाजपा आहे.

बंगालने दीदींना १० वर्ष दिली, पण त्यांनी धोका दिला.

शुक्रवारी काही वेळ संपूर्ण जगातील व्हॉटसअ‍ॅप बंद झाले होते. त्याचा संदर्भ देताना मोदी म्हणाले, तुम्हा सर्वांना माहिती असेल की रात्री व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ४० मिनिटांसाठी डाऊन होत. प्रत्येकजण चिंतीत होता, एक तास त्यांना अडचण येत होती. बंगालमध्ये विकास, लोकांचा सरकारवरील विश्वास सगळं काही गेल्या ५० वर्षांपासून डाऊन आहे. दीदी, बंगालने तुम्हाला काम करण्यासाठी १० वर्ष दिली पण तुम्ही हिंसाचार आणि गैरकारभार करत लोकांची फसवणूक केलीत.

दीदी म्हणतात खेळ संपला, पण सत्य हे आहे की विकास सुरु होणार आहे. दीदींचं सरकार राष्ट्रीय शिक्षण योजनाची अमलबजावणी करण्यास नकार देत आहे. त्यांना बंगालमधील तरुणांच्या भविष्याची चिंता नाही. आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की, दीदींना बंगालमधील तरुणांच्या भविष्यासोबत खेळू देणार नाही.

The only mafia industry in West Bengal, Prime Minister Narendra Modi’s attack on Mamata Banerjee

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*