‘ड्रॅगन’चा भारतासोबत चर्चेचा फक्त देखावा, गुप्तपणे LACवर लष्कराच्या तैनातीत वाढ

The mere appearance of talks with India from china, increase in army deployment on LAC

भारत आणि चीनमधील संघर्ष रोखण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील विश्वास वाढविण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मीने सप्टेंबर-2020 मध्ये एक करार केला होता, जो आता गुप्तपणे मोडला जात आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. याव्यतिरिक्त, चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) तणावग्रस्त भागात गुप्तपणे सैन्याची तैनात वाढवली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील संघर्ष रोखण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील विश्वास वाढविण्यासाठी पीपल्स लिबरेशन आर्मीने सप्टेंबर-2020 मध्ये एक करार केला होता, जो आता गुप्तपणे मोडला जात आहे. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. याव्यतिरिक्त, चिनी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील (एलएसी) तणावग्रस्त भागात गुप्तपणे सैन्याची तैनात वाढवली आहे. हा करार फक्त चार महिन्यांपूर्वी झाला होता. The mere appearance of talks with India from china, increase in army deployment on LAC

मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे दिसून आले आहे की, 21 सप्टेंबर 2020 रोजी सहाव्या फेरीच्या चर्चेनंतर चिनी सैन्याने जारी केलेले संयुक्त निवेदन नाकारले गेले आहे. एवढेच नव्हे, तर चीनने गुप्तपणे बरेच उपदव्याप केले आहेत.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, भारत आणि चीन यांनी यावर सहमती दर्शविली होती की, दोन्ही देश झालेल्या सहमतीची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करतील. जमिनीवर संवाद मजबूत करतील, गैरसमज व चुकीचे निर्णय टाळतील, सैन्य वाढ करणे थांबवतील, जमिनीवर परिस्थितीत एकतर्फी बदल टाळतील. याशिवाय अशा सर्व कारवाया टाळतील ज्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे. परंतु चारच महिन्यांनी पुन्हा एकदा परिस्थिती जैसे थे झाली आहे. दोन्ही देशांमध्ये विश्वास कायम करण्यासाठी जी संधी करण्यात आली होती, ती आता निरर्थक ठरल्याचे दिसून येत आहे.

The mere appearance of talks with India from china, increase in army deployment on LAC

विविध माध्यमांनी सैन्य सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, भारतीय सैन्याकडेही इतर कोणताही पर्याय नव्हता. यामुळे सर्व तणावग्रस्त भागांमध्ये भारतीय सैन्याची जमवाजमव वाढवली आहे. काही सेक्टर्समध्ये चीन आपली ताकद वाढवत असल्याने भारताने खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षात्मक पाऊल उचलले आहे.लडाख खोऱ्यात सध्या उणे 30 डिग्री तापमान आहे. परंतु दोन्ही बाजूंनी सैन्यामध्ये कोणतीही कपात झालेली नाही. हिवाळा असल्याने सीमेवर शांतता आहे, परंतु तणाव तसूभरही कमी झालेला नाही.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था