साक्षरता दर कमी असताना देशात निवडणुका जिंकायचे कोण? आणि साक्षरता वाढल्यावर जिंकतेय कोण?

काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी ट्विट करून जिथे साक्षरतेचा दर अधिक आहे, तिथे काँग्रेस आणि भाजपेतर पक्ष जिंकताहेत आणि जिथे सारक्षरतेचा दर कमी आहे, तिथे भाजप जिंकतोय, असा डेमॉग्राफिकल ग्राफ मांडून दावा केलाय… त्यांच्या म्हणण्यानुसार सुशिक्षित भारतीय नागरिक भाजप विरोधात मतदान करतोय, तर अशिक्षित भारतीय नागरिक भाजपला निवडतो आहे. the lower literacy & social development they enjoy & the more they are inclined to vote for the BJP?, claims shashi tharoor


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली । देशातला साक्षरता दर अर्थात साक्षरतेचे प्रमाण कमी असताना सार्वत्रिक निवडणूका जिंकायचे कोण? आणि साक्षरतेचे प्रमाण वाढल्यावर जिंकतेय कोण?, असा प्रश्न आता विचारला जातोय, त्यावर एक वेगळे मंथन सुरू झालेय त्याला कारणही तसेच घडलेय… काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार शशी थरूर यांनी ट्विट करून जिथे साक्षरतेचा दर अधिक आहे, तिथे काँग्रेस आणि भाजपेतर पक्ष जिंकताहेत आणि जिथे सारक्षरतेचा दर कमी आहे, तिथे भाजप जिंकतोय, असा डेमॉग्राफिकल ग्राफ मांडून दावा केलाय.त्यांच्या म्हणण्यानुसार सुशिक्षित भारतीय नागरिक भाजप विरोधात मतदान करतोय, तर अशिक्षित भारतीय नागरिक भाजपला निवडतो आहे. वरवर पाहता या दाव्यात तथ्य वाटते, कारण केरळ, तामिळनाडू आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये उत्तरेपेक्षा साक्षरता आणि शिक्षणाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तिथे डावे पक्ष आणि काँग्रेस जिंकताहेत. तर उत्तरेतील सर्व राज्यांमध्ये भाजप जिंकतेय…

पण या दाव्यात अर्धसत्य दडलेय… कारण फक्त देशातील साक्षरतेचा प्रादेशिक निकष लावून जिंकण्या – हरण्याची गणिते मांडली, तर १९५२ पासूनच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निव़डणूकांचा इतिहास पाहिला तर दर निवडणूकीगणिक साक्षरतेचे प्रमाण वाढताना दिसतेय, तर काँग्रेसच्या कामगिरीचा दर घसरताना दिसतोय.

the lower literacy & social development they enjoy & the more they are inclined to vote for the BJP?, claims shashi tharoor

हे पुढील लोकसभा निवडणूकीच्या पुढील आकडेवारीतून स्पष्ट होईल.

१९६० साक्षरता दर २८ % – काँग्रेस ३७१ जागा

१९८० साक्षरता दर ४३ % – काँग्रेस १६३ जागा

२००० साक्षरता दर ६४ % – काँग्रेस ११४ जागा

२०२० साक्षरता ७८% काँग्रेस ५४ जागा

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*