The January 26 violence plot was well-planned, the SIT investigation revealed

26 जानेवारी हिंसाचाराचा कट सुनियोजितच होता, SITच्या तपासात उघड

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल सिंह नावाच्या ज्या उपद्रवी व्यक्ती दिल्ली पोलिसांनी 50 हजारांचे बक्षीस ठेवले आहे, त्याची हिंसाचाराच्या कटात मोठी भूमिका आहे. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, इक्बाल सिंगने लाल किल्ल्याच्या आत गर्दी जमविली, लाहोर दरवाजा तोडण्यासाठी त्यानेच भडकावले. The January 26 violence plot was well-planned, the SIT investigation revealed


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इक्बाल सिंह नावाच्या ज्या उपद्रवी व्यक्ती दिल्ली पोलिसांनी 50 हजारांचे बक्षीस ठेवले आहे, त्याची हिंसाचाराच्या कटात मोठी भूमिका आहे. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार, इक्बाल सिंगने लाल किल्ल्याच्या आत गर्दी जमविली, लाहोर दरवाजा तोडण्यासाठी त्यानेच भडकावले. इक्बाल सिंगच्या सांगण्यावरूनच लाल किल्ल्याचा लाहोर दरवाजा तोडण्यात आला आणि लाल किल्ल्याच्या तटबंदीवर त्यांचा झेंडा फडकावण्याचा त्याचा हेतू होता.आतापर्यंत 124 हून जास्त जणांना अटक

इक्बाल सिंग ज्या व्हिडिओमध्ये दिसतोय त्यावरून तो जमावाला भडकावत असल्याचेही स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, तर काही इतर जण त्याच्याबरोबर उपस्थित होते, तेही हेच काम करत होते. दिल्ली पोलिसांच्या एसआयटीची गुन्हे शाखा 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराचा तपास करत आहे. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 124 हून अधिक लोकांना अटक केली आहे, तर 44 एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. गुन्हे शाखा एसआयटी 44 प्रकरणांमध्ये 14 प्रकरणांचा तपास करत आहे. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी आतापर्यंत 70 हून अधिक उपद्रवी व्यक्तींची छायाचित्रेही जाहीर केली आहेत.

The January 26 violence plot was well-planned, the SIT investigation revealed

दरम्यान, दिल्ली हिंसाचाराचा कटात परदेशी शक्तींचा हात असल्याचे समोर येत आहे. याबाबत कॅनडा स्थित एका खलिस्तानी संघटनेवर पोलिसांचा संशय आहे. याच संस्थेने पैसै देऊन परदेशी सेलिब्रिटींना शेतकरी आंदोलनावर भाष्य करायला लावल्याचा आरोप होत आहे.

The January 26 violence plot was well-planned, the SIT investigation revealed

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*