बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची महत्त्वपूर्ण भूमिका : हे माझ्या जीवनातील पहिलंच आंदोलन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

  •  भारत आणि बांगलादेश या देशातील सरकार संवेदनशीलतेची जाणीव करून देत आहे आम्ही या दिशेने अर्थपूर्ण प्रयत्न करीत आहेत.  परस्पर विश्वास आणि सहकार्यामुळे प्रत्येक निराकरण होऊ शकते. आमचा भू-सीमा करारदेखील याला साक्षीदार आहे.
  • बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ५०वर्ष तर भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असतानाा हे देश एकत्र येणे हा योगायोग आहे .
  • आपल्या दोघांसाठी 21 व्या शतकातील पुढील 25 वर्षांचा प्रवास खूप महत्वाचा आहे. आपला वारसादेखील सामायिक आहे.

विशेष प्रतिनिधी 

ढाका : बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दिनाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशाच्या दौऱ्यावर  आहेत. कोरोना काळातील त्यांचा हा पहिलाच दौरा असून त्यांनी बांगलादेशच्या दौऱ्यात मोठं विधान केलं आहे. इथल्या लोकांवर पाकिस्तानी लष्कराने केलेले अत्याचार आम्हाला त्रस्त करत , आम्हाला कित्येक दिवस झोप लागत नव्हती.The important role of the then Prime Minister Smt. Indira Gandhi in the Bangladesh freedom struggle: This was the first movement of my life: Prime Minister Narendra Modi

बांगलादेशाच्या स्वातंत्र्यलढ्याला समाजाच्या प्रत्येक घटकाचे सहकार्य लाभले. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे प्रयत्न आणि त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका सर्वश्रुत आहे .इथल्या तरुण पिढीला  बांगलादेशातील माझ्या भाऊ व बहिणींना  मला अभिमानाने आठवण करून द्यायची आहे की बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणे ही माझ्या जीवनातील पहिली चळवळ होती.

ढाका येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. त्यावेळी मी 20-22 वर्षाचा असेल. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होात, असं मोदी म्हणाले.

भारत-बांगलादेश यांच्यात सखोल संबंधांची घोषणा करताना ते म्हणाले, “भारत-बांग्लादेश भागीदारीच्या ५० वर्ष निमित्ताने मी बांगलादेशातील उद्योजकांना निमंत्रण देऊ इच्छितो. त्यांनी आमच्या नाविन्यपूर्ण परिसंस्थेशी संबंध जोडला पाहिजे आणि उद्योजकांना भेट दिली पाहिजे.आम्ही त्यांच्याकडून शिकू आणि ते आमच्याकडूनही शिकतील. मी बांगलादेशातील तरुणांसाठी स्वर्ण जयंती शिष्यवृत्ती जाहीर करतो. ”

ते पुढे म्हणाले, “ज्यांनी बांगलादेशच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह घातले त्यांना बांग्लादेशने चुकीचे सिद्ध केले. परस्पर विश्वास आणि सहकार्यामुळे प्रत्येक तोडगा निघू शकतो हे आम्ही दाखवून दिले आहे. आमची जमीन सीमा करारदेखील याला साक्ष देतो. आम्ही दोघांनीही अधिकाधिक वेगाने प्रगती करावी अशी माझी इच्छा आहे.

The important role of the then Prime Minister Smt. Indira Gandhi in the Bangladesh freedom struggle: This was the first movement of my life: Prime Minister Narendra Modi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*