डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग सुनावणीला 8 फेब्रुवारीला प्रारंभ


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोगाची सुनावणी 8 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले तर त्यांना आगामी निवडणूक लढता येणार नाही. The impeachment hearing against Donald Trump begins on February 8
सार्वत्रिक निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावर ‘गिरे तो भी टांग उपर ‘, मी म्हणेन ती पूर्व दिशा ,अशा तोऱ्यात वागणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना सिनेटने महाभियोग प्रस्ताव मान्य करून जोरदार थप्पड दिली होती. त्यानंतर ही प्रक्रिया सुरु करण्यास सुरुवात झाली.सिनेटचे नेते, खासदार चक शुमर यांनी महाभियोग प्रक्रियेबाबत माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी 6 जानेवारीला कॅपिटॉल हाऊसमध्ये घुसून गोंधळ घातला होता. हिंसाचारात 5 जणांचा बळी गेला होता. हिंसाचाराला चिथावणी दिल्यासामुळे ट्रम्प यांचे ट्विटर , यू ट्यूब आणि फेसबुक अकाउंट बंद केले होते. हिंसाचार हा लोकशाहीला लागलेला हा कलंक होता. तो विसरायचा प्रयत्न करतो आहे. पण देशाच्या ऐक्यासाठी सत्य समजणे आवश्यक आहे. त्यामुळे महाभियोगाच्या प्रक्रियेचा आग्रह धरला आहे, असे शुमर यांनी सांगितले.

The impeachment hearing against Donald Trump begins on February 8

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था