पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी , 2011 च्या जनगणनेतील निष्कर्ष ; उत्तरप्रदेश दुसऱ्या तर आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक भिकारी असल्याचे 2011 मध्ये केलेल्या जनगणनेत स्पष्ट झाले असून उत्तरप्रदेश दुसऱ्या तर आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे केंद्र शासित लक्षद्वीपमध्ये केवळ दोन भिकारी आढळले आहेत. The highest number of beggars in West Bengal, according to the 2011 census

देशात 2011 मध्ये जनगणना करण्यात आली होती. तेव्हा देशातील कोणत्या राज्यात किती भिकारी आहेत, याची आकडेवारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सादर केली.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावर चंद गेहलोत यांनी सांगितले की देशात 4 लाख 13 हजार 670 भिकारी आहेत. त्यात 2 लाख 21 हजार 673 पुरुष आणि 1 लाख 91 हजार 997 महिला भिकारी आहेत. पश्चिम बंगाल, आसाम आणि मणीपुरमध्ये महिला भिकाऱ्यांची संख्या जास्त आहे.पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 81 हजार 224, उत्तरप्रदेशात 65 हजार 835 , आंध्र प्रदेशात 30 हजार 218, बिहारमध्ये 29 हजार 723, मध्यप्रदेशात 28 हजार 695, आणि राजस्थानात 28 हजार 853 भिकारी असल्याचे 2011 च्या जनगणनेत स्पष्ट झाले.

दादरा नगर हवेली दमण आणि दिव, अंदमान आणि निकोबार येथे अनुक्रमे 19, 22 आणि 56 भिकारी होते. नवी दिल्लीत 2 हजार 187 आणि चंदीगडमध्ये 121 तर उत्तरपूर्व राज्यात आसाममध्ये सर्वाधिक 22 हजार 116 आणि मिझोराममध्ये सर्वात कमी 53 भिकारी आढळले होते, असे त्यांनी सांगितले.

The highest number of beggars in West Bengal, according to the 2011 census

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*