कोरोना लसीवर पहिला हक्क कोरोना योध्द्यांचा; ज्याला धोका त्यालाही पहिली लस; पंतप्रधानांची ग्वाही; विक्रमी लसीकरणा मोहिमेचा शुभारंभ


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीवर पहिला हक्क कोरोना योध्द्यांचा आहे. पण ज्याला धोका सर्वाधिक आणि गरज जास्त त्यालाही पहिली लस मिळेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी विक्रमी लसीकरण मोहिमेच्या शुभारंभात दिली. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी करोना लस मिळेल,” असं मोदी यांनी स्पष्ट केले. The first claim on the corona vaccine belongs to the Corona Warriors; The first vaccine for anyone at risk; Testimony of the Prime Minister; Launch of record vaccination campaign

मोदी म्हणाले की भारतातील लसीकरण अभियान मानवतावादी सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्या सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सर्वात आधी लस दिली जाईल. ज्याला कोरोना होण्याचा धोका सर्वाधिक आहे, त्या व्यक्तींना सर्वात आधी लस मिळेल.आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. कारण या सगळ्यांचा करोना लसीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदीर असणाऱ्या लोकांना लस दिली जाईल.

-विक्रमी लसीकरण मोहीम
“जगाच्या इतिहासात इतक्या व्यापक स्वरूपातील लसीकरण यापूर्वी कधीही झालेले नाही. जगात १०० पेक्षा अधिक देश असे आहेत की, ज्यांची लोकसंख्या ३ कोटींपेक्षा कमी आहे. आणि भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे.

-दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस

पंतप्रधान मोदी यांनी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची माहिती दिली. “पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोरोना योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल.

३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले जगात फक्त तीनच देश आहे. चीन, अमेरिका आणि भारत. आणि भारतात जागतिक पातळीवर विक्रमी ठरणारी लसीकरण मोहीम होते आहे.

The first claim on the corona vaccine belongs to the Corona Warriors; The first vaccine for anyone at risk; Testimony of the Prime Minister; Launch of record vaccination campaign

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी