Inspiring । गोशाळेत काम करून तिथेच केला अभ्यास, शेतकरी कन्या आता बनणार न्यायाधीश

दृढनिश्चयाच्या बळावर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. असेच अनन्यसाधारण यश एका शेतकरी कन्येने मिळवले आहे. तिने गोशाळेतील कामे करतच बीए, एलएलबी पूर्ण केली आणि नंतर एलएलएममध्ये प्रथम स्थान मिळविले आहे. लवकरच तिची न्यायाधीशपदी नियुक्ती होणार आहे. the farmer’s daughter will now become a judge


विशेष प्रतिनिधी

उदयपूर : ‘असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे’ अशा शब्दांत संत तुकाराम महाराजांनी अभ्यासाचे महत्त्व सांगितलेले आहे. दृढनिश्चयाच्या बळावर तुम्हाला कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. असेच अनन्यसाधारण यश एका शेतकरी कन्येने मिळवले आहे. तिने गोशाळेतील कामे करतच बीए, एलएलबी पूर्ण केली आणि नंतर एलएलएममध्ये प्रथम स्थान मिळविले आहे. लवकरच तिची न्यायाधीशपदी नियुक्ती होणार आहे. तिने राजस्थानातील न्यायिक सेवा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. हे अविश्वसनीय वाटत असले तरी खरे आहे. उदयपूरची 26 वर्षीय सोनल शर्मा ही दुध विक्रेत्याची मुलगी आहे. तिने तेलाच्या रिकाम्या डब्यांपासून बनवलेल्या टेबलवर गोशाळेत अभ्यास करत हे यश मिळवले. आता ती राजस्थानच्या सत्र न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्त होणार आहे.

सोनल दहा वर्षांची असतानापासूनच गोठ्यातील स्वच्छता, वडिलांना दूध वाटपात मदत करण्यासाठी दररोज पहाटे 4 वाजता उठत असे. घरातील ही नैमित्तिक कामे आटोपून तिने न चुकता शालेय व नंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. या जिद्दीच्या जोरावरच तिने आपले न्यायाधीश होण्याचे स्वप्न आज सत्यात उतरवले आहे.

न्यायालयीन परीक्षांचा निकाल 23 डिसेंबर रोजी आला. याच दिवशी सोनलला तिच्या न्यायालयातील निवडीची माहिती मिळाली. सोनल म्हणते, ‘मला नेहमी न्यायाधीश व्हायचे होते, कारण मी न्यायाला मी एका पुरस्कृत नोकरीच्या रूपात मानते. मी लहानपणापासूनच गरिबी पाहिलेली आहे, यामुळेच मला गरिबांच्या समोरील अडचणींची जाण आहे. म्हणून माझा विश्वास आहे की, मी माझे कार्य प्रामाणिकपणाने करू शकेन.

the farmer’s daughter will now become a judge

जोधपूरच्या ज्युडिशियल अकॅडमीमध्ये एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर सोनलला सत्र न्यायालयात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणून नियुक्त केले जाईल. ती म्हणाली, ‘आज मला माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा अभिमान आहे, पण सुरुवातीला माझ्या वडिलांच्या व्यवसायाबद्दल सांगायला मला लाज वाटत असे. सोनलला अनेक आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले. म्हणून तिने स्वत: परीक्षेची तयारी केली आणि दररोज 10 ते 12 तास अभ्यास केला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*