मेड इन इंडियाची विश्वासार्हता जागतिक स्तरावी जपली पाहिजे, पंतप्रधानांचे आवाहन

नवीन दशकातील हा शुभारंभ देशाचा गौरव वाढवणारा आहे. शास्त्रज्ञांनी एक नाही तर दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन तयार करण्यात यश मिळवले आहे. देशाच्या शास्त्रज्ञांच्या योगदानावर गर्व आहे. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू होणार आहे. तसेच मेड इन इंडियाची जागतिक स्तरावर विश्वासार्हता जपली पाहिजे. क्वालिटीनेच प्रॉडक्ट्ची ताकद वाढेल, असे पंतप्रधान म्हणाले. The credibility of Made in India should be maintained globally, the Prime Minister appealed


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नवीन दशकातील हा शुभारंभ देशाचा गौरव वाढवणारा आहे. शास्त्रज्ञांनी एक नाही तर दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन तयार करण्यात यश मिळवले आहे. देशाच्या शास्त्रज्ञांच्या योगदानावर गर्व आहे. जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम सुरू होणार आहे. तसेच मेड इन इंडियाची जागतिक स्तरावर विश्वासार्हता जपली पाहिजे. क्वालिटीनेच प्रॉडक्ट्ची ताकद वाढेल, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय मेट्रोलॉजी कॉनक्लेव्हचे उद्घाटन केले. पंतप्रधान म्हणाले की, आत्मनिर्भर भारत लक्षात ठेवून पुढे जायचे आहे. देशाच्या वैज्ञानिक उत्क्रांतीत महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली गेली आहे. आपण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा सुरुवात गुलामगिरीतून बाहेर पडलेल्या भारताच्या नवनिमार्णावर केली होती. तुमच्या भूमिकेचा आणखी विस्तार झाला आहे. 2047 मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील. आत्मनिर्भर भारताचा संकल्प लक्षात घेऊन आपण नवीन बेंचमार्क तयार करण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.मेड इन इंडियाची ग्लोबल डिमांड, ग्लोबल स्वीकारार्हता या दिशेने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या देशात सरकारी सेक्टर असो की खासगी सेक्टरमधील सर्व्हिस क्वालिटी चांगली असायला हवी. आपले क्वालिटी स्टँडर्ड जगभरात भारत आणि भारताच्या उत्पादनाची ताकद वाढवण्यासाठी गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान म्हणाले, आपल्याला फक्त भारतीय उत्पादनांनी जग भरायचं नाही, तर जगभरातील ग्राहकांच्या विश्वासाला आपल्याला पात्र ठरायचे आहे. आपल्या ब्रँड इंडियाला क्वालिटी आणि क्वान्टिटी अशा दोन्ही पातळ्यांवर विश्वासपात्र ठरवायचे आहे. भारतीय वस्तू खरेदी करणाऱ्या प्रत्येकाचे मन आपल्याला जिंकायचे आहे. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी हे गरजेचे आहे.

The credibility of Made in India should be maintained globally, the Prime Minister appealed

कोणत्याही प्रगतीशील समाजात संशोधन जीवनाचे नैसर्गिक स्वरूप देखील असते. त्याचे परिणाम व्यावसायिक आणि सामाजिक आहेत. बऱ्याच वेळा संशोधन करत असताना, भविष्यात कशाप्रकारे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. परंतु ज्ञानाचा साठा कधीही वाया जात नाही. आत्म्याप्रमाणे संशोधनही कधी मरत नाही. ग्रेगोर मेंडेल किंवा निकोला टेस्ला यांचे संशोधन त्यांनी जग सोडल्यानंतर उघडकीस आले. पहिल्या महायुद्धासाठी ड्रोनची निर्मिती झाली होती. आज याचा उपयोग वस्तूंची डिलिव्हरी आणि फोटोग्राफीसाठी होत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*