स्वदेशी कोव्हॅक्सिनवर काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली शंका; तातडीच्या वापरासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन सुरक्षेचा केंद्राने दिला निर्वाळा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधासाठी सिरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना केंद्राने परवानगी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल व्ही. जी. सोमाणी यांनी त्यांच्या सुरक्षिततेची ११० टक्के हमी दिली आहे. तरीही भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या स्वदेशी लसीबद्दल काँग्रेसच्या दोन नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. The Covaxin has not yet had Phase 3 trials. Approval was premature and could be dangerous, claims shashi tharoor

भारतात सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. मात्र, काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश व शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या स्वदेशी कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.“कोव्हॅक्सिनवर अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचणी झालेली नाही. या लसीला अगोदरच मान्यता दिली आहे. हे धोकादायक ठरू शकते. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर टाळायला हवा. भारतात अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसीकरणाची मोहीम सुरू करू शकतो.” असे शशी थरूर यांनी म्हटले आहे.

थरूर यांच्याबरोबरच जयराम रमेश यांनी देखील कोव्हॅक्सिनबद्दल आक्षेप नोंदवला असून, “भारत बायोटेक प्रथम श्रेणीचा उद्योग आहे. परंतु आश्चर्यकारक बाब ही आहे की, कोव्हॅक्सिनसाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी संबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या प्रोटोकॉलमध्ये सुधारणा केल्या जात आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे.”

The Covaxin has not yet had Phase 3 trials. Approval was premature and could be dangerous, claims shashi tharoor

हेच प्रश्न ड्रग कंट्रोलर जनरल व्ही. जी. सोमाणी यांना सकाळच्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी या मुद्द्यांचा स्पष्ट खुलासाही केला आहे. ते म्हणालेत, “तुम्ही एका गोष्टीची खात्री बाळगा की कोणत्याही सुरक्षिततेची शंका असेल, तर आम्ही त्या लसीला कधीच मान्यता देणार नाही. आम्ही मान्यता दिलेल्या लसी ११० टक्के सुरक्षित आहेत. लसींचे थोडेफार दुष्परिणाम असतातच जसे की दंडावर दुखणे, थोडासा ताप येणे, थोडीशी अॅलर्जी होणे हे तर प्रत्येक लसीसाठी सामान्य आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल होईल. या लसींमुळे नपुंसकता येईल, असे म्हणणे तर बकवास आहे, ” अशी टीकाही सोमाणी यांनी केली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*