देशात आज राष्ट्रीय बालिका दिवस साजरा ; मोदींनी केला देश की बेटी चा हॅशटॅग ट्रेंड


भारतात आज राष्ट्रीय बालिका दिवस साजरा होत आहे. हा दिवस साजरा करण्या मागील मुळ उद्देश मुलींना त्यांचे हक्क आणि समाजातील भेदभावाबद्दल जागरूक करणे असा आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर नेत्यांनी देशातील बिलीकांना अभिवादन करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.  The country celebrates National Girls Day today


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आज राष्ट्रीय बालिका दिवस भारतात साजरा होत आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश मुलींना त्यांचे हक्क आणि समाजातील भेदभावाबद्दल जागरूक करणे असा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील मुलींना अभिवादन करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले की,  ‘आजचा दिवस हा विशेष म्हणजे मुलींच्या सबलीकरणाच्या दिशेने काम करणार्या सर्वांचे कौतुक करण्याचा आहे .

त्यांना सन्मान व संधी मिळेल यासाठी सदैव तत्पर असण्याचा दिवस आहे. राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या देश की बेटी आणि तिच्या विविध क्षेत्रातील कामगिरीला सलाम करतो. मुलींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतलेला आहे . यामध्ये शिक्षणाची सुविधा, उत्तम आरोग्यसेवा यांचा समावेश आहे. ‘भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ट्वीट केले की, ‘ शाळांमध्ये मुलींची संख्या वाढत आहे. लिंग गुणोत्तरात सुधारणा हे स्पष्ट करते की मुलींसाठी चालविण्यात येणार्या योजनांना साकार करण्यात देशाचे मोठे योगदान आहे. सरकार # देशी की बेटी स्वावलंबी होण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून नेहमीच वचनबद्ध आहे. सर्व मुलींना पुन्हा शुभेच्छा! राष्ट्रीय बालीका दिनाच्या निमित्ताने देशातील सर्व मुलींना हार्दिक शुभेच्छा. आमच्या मुली आमचा अभिमान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ पासून सुरू करून आपल्या सरकारने देशकी बेटी साठी जन्मापासून उच्च शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासापर्यंत अनेक पावले उचलली आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्वीट केले, ‘माझ्या मुली माझा अभिमान आहेत, ज्यांनी दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाने वेगवेगळ्या आव्हानांवर मात केली आहे. #देशकीबेटीची उपलब्धी साजरी करूया . केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट केले की, ‘सर्व मुलींना सक्षम बनवूया आणि त्यांच्या स्वप्नांना नवी पंख देऊन प्रेरित करू.आणि त्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही कमतरता राहणार नाही असे वचन देवू ‘.

भाजप च्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांनी देखील सुंदरसे ट्विट करत बालीका दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.’ प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर असतांना आपण त्यांच्यापासून दूर का पळावे ‘असा संदेश देत त्यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे.

The country celebrates National Girls Day today

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती