भाजपने लोकशाही, तर कॉंग्रेसने स्वत:लाच विकायला काढलेय.. केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचा घणाघात

एकीकडे भाजपानं देशातली लोकशाही विकायला काढली असताना दुसरीकडे काँग्रेसनं स्वत:लाच विकायला काढलं आहे. अनेक राज्यांमध्ये लोकांनी काँग्रेसला सत्तेत निवडून दिलं होतं. पण त्यांनी तर स्वत:लाच भाजपाला विकून टाकले, अशी टीका केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : एकीकडे भाजपानं देशातली लोकशाही विकायला काढली असताना दुसरीकडे काँग्रेसनं स्वत:लाच विकायला काढलं आहे. अनेक राज्यांमध्ये लोकांनी काँग्रेसला सत्तेत निवडून दिलं होतं. पण त्यांनी तर स्वत:लाच भाजपाला विकून टाकले, अशी टीका केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी केली आहे. The Congress has sold itself out, Kerala Chief Minister Pinarayi Vijayan allegedपिनरायी विजयन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, हवा तेवढा पैसा ओतायला भाजपा तयार आहे. कारण त्यांनी तो तेवढ्या प्रमाणात जमा देखील केला आहे. काँग्रेस सर्वात मोठी बोली लावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

गोवा, मणिपूर, मध्य प्रदेश, कर्नाटक, पुद्दुचेरी, नागालँड, त्रिपुरा या ठिकाणी काँग्रेसचे अनेक नेते भाजपामध्ये दाखल झाले. काँग्रेस पक्षावर अजिबात विश्वास ठेवता येणार नाही. कारण त्यांचे नेते कधीही भाजपामध्ये दाखल होऊ शकतात. काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये असताना सीएएला विरोध केला आणि आता भाजपामध्ये गेल्यावर ते सीएएला पाठिंबा देत आहेत.

६ एप्रिल रोजी केरळ विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. मात्र, पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्यामुळे केरळ, पुद्दुचेरी, आसाम, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाचही राज्यांचे निकाल २ मे रोजी लावण्यात येणार आहेत. २९ एप्रिल रोजी पश्चिम बंगालमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

The Congress has sold itself out, Kerala Chief Minister Pinarayi Vijayan alleged

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*