अल्बामातील शाळांमध्ये योगावरील बंदी हटविली, नमस्ते म्हणण्यास मात्र बंदी कायम

अमेरिकेतील अल्बामा राज्यातील प्रतिनिधीगृहाने योगावरील बंदी अखेर उठविली आहे. गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणच्या शाळांमध्ये योगावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, नमस्ते म्हणण्यास मात्र बंदी लागू राहणार आहे. The ban on yoga in Alabama schools was lifted, but the ban on saying hello remained


वृत्तसंस्था

मॉंटेगोरी : अमेरिकेतील अल्बामा राज्यातील प्रतिनिधीगृहाने योगावरील बंदी अखेर उठविली आहे. गेल्या अनेक दशकांपासून या ठिकाणच्या शाळांमध्ये योगावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, नमस्ते म्हणण्यास मात्र बंदी लागू राहणार आहे.

अल्बामातील प्रतिनिधीगृहात ७३ विरुध्द २५ मतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की शाळा व्यवस्थापनांनी ठरविले तर ते शाळांमध्ये योगाला परवानगी देऊ शकतात. आता हे विधेयक अल्बामा सिनेटसमोर जाणार आहे.शाळांमधील योगा हा केवळ प्रात्यक्षिके आणि व्यायामाचा भाग म्हणून केला जाईल. यामध्ये मंत्रपठण, पूजापाठ करता येणार नाही. त्याचबरोबर नमस्ते असेही म्हणता येणार नाही. अल्बामा बोर्ड ऑफ एज्युकेशनने १९९३ मध्ये मतदानाद्वारे योगा आणि ध्यानधारणेला बंदी घातली होती. शाळांमध्ये त्यावर बंदी होती. ही बंदी काही प्रतिगाम्यांच्या आग्रहाने लावण्यात आली होती.

डेमॉक्रॅटिक प्रतिनिधी जेरमी ग्रे यांनी हे विधेयक मांडले होते. ते म्हणाले काही जीम शिक्षक शाळेमध्ये योगा शिकवित होते. त्यावर बंदी असल्याचे त्यांना माहितच नव्हते. मात्र, खूप जणांना योगाचा शिक्षणामध्ये सहभाग व्हावा असे वाटत होते. फुटबॉल खेळताना आपण योगाचा वापर केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. मी स्वत: गेल्या सात वर्षांपासून योगा करत आहे. त्यामुळे योगामुळे होणारे सगळे फायदे मला माहित आहेत.

या कायद्यान्वये योगाच्या प्रकारांची नावे इंग्रजीमध्येच असायला हवीत, असे म्हटले आहे. त्याच पध्दतीने विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. त्याचबरोबर योग हा ऐच्छिक असणाऱ्या असून विद्यार्थ्याला त्याऐवजी दुसरा विषय शिकणे शक्य होणार आहे.

The ban on yoga in Alabama schools was lifted, but the ban on saying hello remained

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*