भारतीयांचे अमेरिकन ड्रीम होणार पूर्ण, ज्यो बायडेन यांनी आणलेल्या विधेयकामुळे दिलासा

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या काही धोरणांमुळे अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांचे अमेरिकन ड्रीम संकटात सपाडले होते. तेथे राहणाऱ्या नाही धास्ती वाटत होती. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेत राहणाऱ्या पाच लाखांहून अधिक भारतीयांना फायदा होईल, असे विधेयक अमेरिकेतील संसदेत मंजूर करून घेतले. The American dream of Indians will be fulfilled, a relief brought by the bill brought by Joe Biden


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या काही धोरणांमुळे अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांचे अमेरिकन ड्रीम संकटात सपाडले होते. तेथे राहणाऱ्यां नाही धास्ती वाटत होती. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकेत राहणाऱ्या पाच लाखांहून अधिक भारतीयांना फायदा होईल, असे विधेयक अमेरिकेतील संसदेत मंजूर करून घेतले.

अमेरिकन संसदेच्या हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव या सदनात अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस अ‍ॅक्ट नावाचे विधेयक मंजूर करण्यात आले होते. याची अंमलबजावणी केल्यानंतर लहानपणापासून अवैध्य रुपात अमेरिकेत राहणाऱ्या प्रवासी लोकांना नागरिकत्व मिळवणं सोपं होईल.

5 लाखांहून अधिक भारतीयांना याचा फायदा होणार आहे.अमेरिकेच्या संसदेच्या खालच्या सदनने अमेरिकन ड्रीम अँड प्रॉमिस अ‍ॅक्टला 228-197 मतांच्या फरकाने पारित करीत याला सीनेटमध्ये पाठविण्यात आलं आहे. येथून पारित झाल्यानंतर कायदा तयार होईल. या बिलामुळे ज्यांना कायदेशीर निरीक्षणाखाली राहावं लागत आहे आणि ज्यांना देशवापसीची भीती असले अशांना नागरिकत्व मिळवणं सोपं होईल.सरकारच्या या पावलामुळे 5 लाखांहून अधिक भारतीयांसह तब्बल 1 कोटी 10 लाख असेही नागरिक आहेत, ज्यांना कायदपत्रं नसतानाही अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बिलचं समर्थन करीत असताना म्हणाले की, माझी इच्छा आहे काँग्रेसने हे बिल पारित करावे. ज्यामुळे 1.1 कोटी प्रवाशांना देशाचं नागरिकत्व मिळणं शक्य शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी अमेरिकेत जाण्याचं स्वप्न, बहुतांशी भारतीय पाहतात आणि आजवर ते मोठ्या प्रमाणावर साकारही झालं आहे. परंतु अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळे या स्वप्नासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर अनेकांचे ‘अमेरिकन ड्रीम’ साकार होऊ लागले. हजारो तरुण-तरुणी अमेरिकेत जाऊ लागले. मात्र, ट्रंप यांच्या काही निर्णयांमुळे सुमारे १५ लाख भारतीयांचे भवितव्य व अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्यांच्याकडे व्हिसा आहे, अशा भारतीयांचे भवितव्य अधांतरी झाले होते. या विधेयकामुळे त्यांचा मार्ग सुकर होणार आहे.

The American dream of Indians will be fulfilled, a relief brought by the bill brought by Joe Biden

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*