ठाकरे-पवार सरकार सोनियांच्या ताटाखालचे मांजर, अतुल भातखळकर यांची टीका

केजरीवाल यांना फार मागे टाकून उद्धवजी बनले देशाचे ‘नंबर वन यू-टर्न मुख्यमंत्री’. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. आपल्या सरकारचा आदेश आपणच रद्द करण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला आहे. सोनिया गांधींच्या ताटाखालचे मांजर असल्याचे त्यांनी पुन्हा सिद्ध केले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : केजरीवाल यांना फार मागे टाकून उद्धवजी बनले देशाचे ‘नंबर वन यूटर्न मुख्यमंत्री’. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश ठाकरे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. आपल्या सरकारचा आदेश आपणच रद्द करण्याचा भीम पराक्रम त्यांनी केला आहे. सोनिया गांधींच्या ताटाखालचे मांजर असल्याचे त्यांनी पुन्हा सिद्ध केले, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची अंमलबजावणी करणारा अध्यादेश राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. पणन संचालकांचा विरोध मोडून काढण्यासाठी काही तासात आमदारांच्या अपीलावर सुनावणी घेऊन अध्यादेश रद्द करण्यात आला.

यामध्ये काँग्रेसची आक्रमक भूमिकाही कारणीभूत ठरली आहे. अध्यादेशाला स्थगिती दिली नाही तर कॅबिनेटला अनुपस्थित राहण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला होता. यावरून भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

शेतकर्यांच्या हितासाठी शेतमाल नियमनमुक्त करण्यासंदर्भातील केंद्र सरकारच्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याचे आदेश गेल्या ऑगस्ट महिन्यात काढण्यात आल्याने महाविकास आघाडीची पंचाईत झाली होती. ल त्यातूनच या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.

केंद्र सरकारन गेल्या जून महिन्यात अध्यादेश काढला होता. यानंतर सर्व राज्यांना केंद्राच्या वतीने पत्र पाठवून या कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.

यानुसार महाराष्ट्रात या वटहुकूमानुसार अंमलबजावणी करावी, असे आदेश राज्य सरकारच्या पणन विभागाच्या वतीने काढण्यात आले होते. उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता टिकवण्यासाठी कॉंग्रेसच्या इशार्यानुसार हालत असल्याची टीका यामुळे होऊ लागली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*