ठाकरे – पवार सरकारने “राजकीय खापर” पोलिसांवर फोडले; परमवीर सिंग यांची अखेर बदली

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनसुख हिरेन – सचिन वाझे प्रकरणावरून अडचणीत आलेल्या ठाकरे – पवार सरकारने “राजकीय खापर” अखेर पोलिसांवर फोडले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली. Thackeray Pawar government lashes out at police Paramvir Singh was finally replaced

सरकारचा मोठा निर्णय श्री हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त रजनीश शेठ यांच्याकडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून दिली.प्रत्यक्षात करणार ठाकरे – पवार आणि भरणार पोलीस अशी बातमी द फोकस इंडियाने यापूर्वीच दिली होती आणि तसेच घडले सचिन वाझे प्रकरणात एकापाठोपाठ एक खुलासे होताना शिवसेनेच्या काही नेत्यांची नावे पुढे येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीला या प्रकरणाची दखल घेतली नाही.

परंतु नंतर दखल घेणे भाग पडले कारण संशयाची सुई गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ही सरकत होती. दोन दिवस झालेल्या महा विकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी राजकीय दृष्ट्या आपल्या शेकतेय हे पाहिल्यावर ती पोलिसांवर ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार परमवीर सिंग यांची बदली करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

Thackeray Pawar government lashes out at police Paramvir Singh was finally replaced

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*