औरंगाबाद शहराचे नामांतर ठाकरे – पवार – काँग्रेस सरकारने टाळले; औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर

औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराचा मुद्दा भाजपने आणि मराठा संघटनांनी तापविल्यानंतर शिवसेना अडचणीत आली. काँग्रेसने तर नामांतराला थेट विरोध करून काँग्रेसने ठाकरे – पवार सरकारपुढेच पेच निर्माण केला. Thackeray-Pawar-Congress government avoids renaming Aurangabad city


विशेष प्रतिनिधी

मुंबई : औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्द्याला बगल देत ठाकरे – पवार – काँग्रेस सरकारने तथाकथित गनिमी कावा करत औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्यास ठाकरे – पवार मंत्रिमंडळाने आज मंजूरी दिली.

औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतराचा मुद्दा भाजपने आणि मराठा संघटनांनी तापविल्यानंतर शिवसेना अडचणीत आली. काँग्रेसने तर नामांतराला थेट विरोध करून काँग्रेसने ठाकरे – पवार सरकारपुढेच पेच निर्माण केला. यातून तथाकथित गमिनी काव्याने मार्ग काढत ठाकरे – पवार – काँग्रेस मंत्रिमंडळाने औरंगाबाद शहराच्या नामांतराऐवजी औरंगाबाद विमानतळाला छत्रपति संभाजी महाराजांचे नाव देऊन मूळ नामांतराच्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांना कळवले आहे. याचे स्मरणपत्र ठाकरे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदिप पुरी यांना पाठविले आहे.

Thackeray-Pawar-Congress government avoids renaming Aurangabad city

या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर केला आहे. नामकरणाबाबत मुख्य सचिव यांच्या स्तरावरूनही केंद्रीय मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याबाबतची अधिसूचना लवकरात लवकर काढावी, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*