Chief Minister Thackeray refuses permission to Governor Koshyari from using aircraft!

Breking News : ठाकरे सरकारने पुन्हा केला राज्यपालांचा अपमान ; ‘स्पाईसजेट’ने उत्तराखंडला रवाना ; फडणवीस संतापले

राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली.राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. परंतु सरकारी विमानाने प्रवासाची परवानगी न मिळाल्याने अखेर राज्यपाल आणि त्यांचा खासगी स्टाफ स्पाईसजेटच्या विमानाने रवाना झाले. मात्र सरकारी विमान नाकारल्याने पुन्हा राजकीय वादंग माजला आहे.विमान परवानगी नसल्याने  त्यांना विमान वापरता येणार नाही अस वेळेवर सांगण्यात आल .

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट कंपनीच्या विमानाने  राज्यपाल कोश्यारी मुंबईहून डेहराडूनला रवाना झाले. राजभवनाच्या पीआरओकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.Thackeray government again insults governor; SpiceJet leaves for Uttarakhand; Fadnavis got angry

राज्यपाल कार्यालयाने आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. राज्यपाल सरकारी विमानाने मसुरीला जाणार होते. मात्र शेवटपर्यंत त्यांना परवानगी मिळाली नाही. महत्त्वाचं म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली. दुपारी सव्वाबारा वाजताच्या खासगी विमानाने राज्यपाल कोश्यारी उत्तराखंडला रवाना झाले. दुपारी सव्वा दोन वाजता ते डेहराडूनला पोहोचतील. 

राज्यपाल हे संविधानिक पद :  देवेंद्र फडणवीस 

राज्यपालांना विमान नाकारणं हा प्रकार दुर्दैवी आहे. कुणाच्या मालकीची ही मालमत्ता नाही. माझ्या माहितीप्रमाणे जीएडीला पत्र दिलं होतं. तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडे हे पत्र पोहोचलं होतं पण तरीही परवानगी नाकारली. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं. आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केली.राज्यपालांना हवाई परवानगी नाकारुन सूडभावनेचा अतिरेक : प्रवीण दरेकर

राजकारणातील मतभेद समजू शकतो, राज्यपाल घटनात्मक पद आहे. राज्य सरकारनं अतिरेक केला आहे. सूड भावना त्यांच्यामध्ये किती भरलीय हे स्पष्ट होत आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवायचं. त्यांचं अपयश लोकांपुढे जाऊ नये यासाठी वाद निर्माण करायचा त्यावर लोकांचं लक्ष वळवायचं असा या सरकारचा कार्यक्रम आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

Thackeray government again insults governor; SpiceJet leaves for Uttarakhand; Fadnavis got angry

राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल : सुधीर मुनगंटीवार

राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. इतकंच नाही तर राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली.

 

पत्रकारांवर अजित पवार ओरडले     

राज्यपाल प्रकरणावर प्रश्न केला असता अजित पवार पत्रकारांवर ओरडले .  त्यावेळेस त्यांनी माहिती नसल्याचं सांगितलं. ते कुठं व्यस्त होते हेही त्यांनी सांगितलं. मंत्रालयात जाऊन पूर्ण माहिती घेतो आणि पुन्हा तुमच्याशी बोलतो असंही अजित पवार म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*