Terrorist Hafiz Saeed's Khalistani supporter Gopal Singh Chawala to organize tractor rally

पाकिस्तानचा नापाक कट पुन्हा उघड, दहशतवादी हाफिज सईदचा खलिस्तानी समर्थक काढतोय ट्रॅक्टर रॅली

पाक पंतप्रधान इम्रान खान यांना श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची परवानगी देऊन भारताने औदार्य दाखवले आहे. परंतु पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरूच आहेत. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात बसलेला दहशतवादी हाफिज सईदच्या अत्यंत जवळच्या खलिस्तानी समर्थकाने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून पाकमध्येही ट्रॅक्टर रॅली काढण्याची त्याची योजना आहे. गोपालसिंग चावला असे या खलिस्तानी समर्थकाचे नाव आहे. त्याने एक व्हिडिओ जाहीर करून आपल्या कटाची माहिती दिली. Terrorist Hafiz Saeed’s Khalistani supporter Gopal Singh Chawala to organize tractor rally


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाक पंतप्रधान इम्रान खान यांना श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची परवानगी देऊन भारताने औदार्य दाखवले आहे. परंतु पाकिस्तानच्या कुरापती मात्र सुरूच आहेत. विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात बसलेला दहशतवादी हाफिज सईदच्या अत्यंत जवळच्या खलिस्तानी समर्थकाने भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. भारतातील शेतकरी आंदोलनाचे निमित्त करून पाकमध्येही ट्रॅक्टर रॅली काढण्याची त्याची योजना आहे. गोपालसिंग चावला असे या खलिस्तानी समर्थकाचे नाव आहे. त्याने एक व्हिडिओ जाहीर करून आपल्या कटाची माहिती दिली.

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा कट रचण्यात आला होता. कट रचणाऱ्यांचे मनसूबे पूर्ण झाले. परंतु पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने चुकून दिल्लीच्या हिंसाचाराची टूलकिट शेअर केल्याने त्यांचा भंडाफोड झाला.पाकिस्तानात राहणारा गोपालसिंग चावला हा खलिस्तानी समर्थक आहे. तो मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचा निकटवर्तीयही आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय भारताविरुद्ध कारवायांत त्याचा वापर करत असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार गोपालसिंग चावलाने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करून दावा केला आहे की, भारतात सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पाकिस्तानमध्येही ट्रॅक्टर रॅली काढली जाईल. चावलाने अद्याप कोणतीही तारीख जाहीर केली नसली तरी पाकचे नापाक हेतू उघडकीस आल्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे.

Terrorist Hafiz Saeed’s Khalistani supporter Gopal Singh Chawala to organize tractor rally

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचा वापर करून भारतावर आघात करण्याचा पाकचा हेतू, भारत सरकारच्या लक्षात आला होता. यामुळेच 17 फेब्रुवारीला शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या नेतृत्वातील शीख गटाला पाकिस्तानमधील शताब्दी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. पाकिस्ताननेही गोपालसिंग चावलाला करतारपूर कॉरिडोर समितीत समाविष्ट केले. भारताने यावर आक्षेप घेतल्यानंतर त्याचे नाव समितीमधून काढून टाकण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*