अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात 16 सैनिक ठार: 2 गंभीर जखमी

वृत्तसंस्था

काबूल : अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवाद्यांनी पुन्हा तोंड वर काढले आहे. चक्क 16 सैनिकांची घात लावून हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.terrorist attack in Afghanistan 16 soldiers killed: 2 seriously injured

तालिबानी दहशवाद्यांच्या हल्ल्यात अफगाणी सुरक्षा दलाचे 16 सैनिक ठार झाले असून दोन गंभीर जखमी झाले आहेत.अफगाणिस्तानातील कुंडुज प्रांतातील खान अबाद जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हा हल्ला गुरुवारी रात्री एका पोस्टवर केला होता.टापे आखतर परिसरात झालेल्या या हल्ल्यात 16 सैनिक ठार झाले आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी दोन सैनिकांचे अपहरण केल्याचे वृत्त आहे.देशात शांतता प्रक्रिया सुरु असताना झालेल्या हल्ल्याने त्या प्रक्रियेला खीळ बसल्याचे बोलले जात आहे.

terrorist attack in Afghanistan 16 soldiers killed: 2 seriously injured

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*