दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे शिक्षण मंडळाचे आवाहन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एप्रिल महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्यात येणार आहे. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे या संदर्भात सुरू असलेल्या अफवांवर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. Tenth and twelfth exams will be offline only; Board of Education appeals not to believe rumors

राज्य शिक्षण मंडळाने मागील आठवड्यापूर्वीच दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात दहावीची लेखी परीक्षा ही 29 एप्रिल ते बारावीची लेखी परीक्षा ही 23 एप्रिल रोजी सुरू होणार आहे. शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या या दहावी-बारावीच्या या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेण्याचे नियोजन आहे.मात्र राज्यात येत्या काळात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन त्याविषयी आवश्याक वाटल्यास मंडळाकडून निर्णय घेतला जाईल, परंतु तूर्तास जाहीर केलेल्या वेळापत्रकामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे नियोजित वेळेतच या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जातील असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्या ऑनलाईन घेतल्या जातील, अशा अफवा समाज माध्यमावर सुरू असून त्यात कोणतेही तथ्य असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) दिनकर पाटील यांनी दिली.

Tenth and twelfth exams will be offline only; Board of Education appeals not to believe rumors

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*