तेजस एक्स्प्रेस 14 फेब्रुवारीपासून धावणार; दिल्ली, लखनौ आणि मुंबई- अहमदाबाद फेऱ्या सुरु


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनामुळे गेल्या दहा महिन्यापासून बंद असलेली तेजस एक्स्प्रेस 14 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. नवी दिल्ली -लखनौ आणि मुंबई- अहमदाबाद या मार्गावर तेजस एक्स्प्रेसचा प्रवास सुरु होणार असल्याने प्रवाशांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. Tejas Express will run from February 14तेजस एक्स्प्रेस सुरु करण्याचा आग्रह वाढ असल्याने त्या सुरु करण्यात आल्याचे रेल्वे खात्याने स्पष्ट केले. नवे वेळापत्रक मिळाल्यानंतर सेवा सुरू होईल, असे आयआरसीटीने म्हंटले आहे.

तेजस रेल्वे गाडी दृष्टिक्षेपात

  • शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी तिकिट बुकिंग केले जाईल.
  • लखनौ ते नवी दिल्ली भाडे : 870 रुपये
  • कानपूर ते नवी दिल्ली भाडे : 780 रुपये
  • मुंबई ते अहमदाबाद भाडे एसी चेअर : 1,274 रुपये
  • तेजस एक्स्प्रेस मधील प्रवासी संख्या : 700
  • कोव्हिड सेफ्टी किट : सर्व प्रवाशांना देणार
  • कोव्हिड सेफ्टी किटमध्ये काय : हँड सेनिटायझरची बाटली, एक मास्क आणि हातमोजे जोडी देण्यात येणार आहेत.

Tejas Express will run from February 14

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था