ऑस्ट्रेलियाला फत्तेहशिकस्त आता इंग्लड विरूद्ध चक दे ; पुण्यासह चेन्नई, अहमदाबाद येथे होणार टीम इंडियाचे सामने

  • एक वर्षांनी भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन.

विशेष प्रतिनिधी

पुणे : भारताने नुकतीच ऑस्ट्रेलिया मोहिम फत्ते केली . याचे कौतूक पंतप्रधानांसह अर्थसंकल्पातही झाले .हा कठिण दौरा भारतीय संघाने धैर्याने आणि अनेक संकटांचा सामना करत यशस्वी करुन दाखवला. आता भारतीय संघ मायदेशी परतला असून भारतासमोर मायदेशात इंग्लंडचे आव्हान असणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील सामन्यांना आज शुक्रवारपासून (५ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. Team India is ready to ‘ Chakh De’ against England in Pune

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरुवातीला ४ सामन्यांची कसोटी मालिका होईल. त्यानंतर ५ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका होईल. या एकूण १२ सामन्यांसाठी चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या ठिकाणची ३ स्टेडियम निश्चित करण्यात आले असून त्याठिकाणी दोन्ही संघासाठी जैव-सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे.कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर होतील. त्यानंतर, उर्वरित दोन सामने नव्याने बांधण्यात आलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळवले जातील. मालिकेतील तिसरा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा होईल. कसोटी मालिकेतील पहिला सामना ५ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. तसेच तिसरा सामना सोडला तर पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल. तर तिसरा सामना दिवस-रात्र असल्याने दुपारी २.०० वाजता सुरु होईल.

टी२० मालिका अहमदाबादमध्ये

१२ मार्चपासून अहमदाबाद येथे पाच सामन्यांची टी२० मालिका

२३ मार्चपासून पुणे येथे तीन सामन्यांची वनडे मालिका

टी२० मालिकेतील सर्व सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता सुरु होतील. तर वनडे मालिकेतील पहिले दोन सामने दुपारी २.३० ला सुरु होतील आणि शेवटचा सामना सकाळी ९.३० वाजता सुरु होईल.पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ – 

रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वृद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदिप यादव, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल.

नेट गोलंदाज – अंकित राजपूत, आवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गॉथम, सौरभ कुमार

राखीव खेळाडू – केएस भरत, अभिमन्यू इश्वरन, शहाबाज नदीम, राहुल चाहर, प्रियांक पांचाल

इंग्लंडचा भारत दौरा-

कसोटी मालिका

५-९ फेब्रुवारी २०२१ (चेन्नई) वेळ – सकाळी ९.३० वाजता

१३-१७ फेब्रुवारी २०२१ (चेन्नई) वेळ – सकाळी ९.३० वाजता

२४-२८ फेब्रुवारी २०२१ (अहमदाबाद) वेळ – दुपारी २.०० वाजता

४-८ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – सकाळी ९.३० वाजता

टी२० मालिका

१२ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता

१४ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता

१६ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता

१८ मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता

२० मार्च २०२१ (अहमदाबाद) वेळ – संध्याकाळी ६.०० वाजता

वनडे मालिका

२३ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – दुपारी २.३० वाजता

२६ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – दुपारी २.३० वाजता

२८ मार्च २०२१ (पुणे) – वेळ – सकाळी ९.३० वाजता

Team India is ready to ‘ Chakh De’ against England in Pune

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*