टीम अमित शहा रंगली बंगाली रंगात, भाषेपासून खाण्यापिण्याच्या सवयीही करताहेत आत्मसात

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी बंगाल दिग्विजयाची जबाबदारी १३ वरिष्ठ नेत्यांवर दिली आहे. हे नेते पूर्णपणे बंगाली रंंगात रंगून गेले असून भाषेपासून ते खाण्या-पिण्याच्या सवयी आत्मसात करत बंगाली संस्कृती आपलीशी करत आहेत. Team Amit Shah in Bengali colors, from language to eating habits


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी बंगाल दिग्विजयाची जबाबदारी १३ वरिष्ठ नेत्यांवर दिली आहे. हे नेते पूर्णपणे बंगाली रंंगात रंगून गेले असून भाषेपासून ते खाण्या-पिण्याच्या सवयी आत्मसात करत बंगाली संस्कृती आपलीशी करत आहेत.

अमित शहा यांनी निवडणूक हातात घेतल्यावर प्रचंड तयारी करतात. त्याप्रमाणे बंगालमध्येही त्यांनी ही तयारी केली आहे. एखाद्या राज्यात निवडणुका लढवायच्या असतील तर आपले नेते तेथील संस्कृतीशी पूर्णपणे मिसळून गेले पाहिजेत असा शहा यांचा विचार असतो. त्याप्रमाणे बंगालची जबाबदारी असलेले नेते करत आहेत. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच संघटन सरचिटणिस आणि आठ मंत्र्यांवर जबाबदारी दिली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपामध्ये आलेल्या सरचिटणिसांवर मायक्रो मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. यामध्ये सुनील बन्सल, भिखूभाई दलसानिया, रवींद्र राजू, पवन राणा आणि रत्नाकार यांचा समावेश आहे. याशिवाय आठ मंत्र्यांमध्ये संजीव बलियान, गजेंद्र सिंह शेखावत, नित्यानंत राय, अर्जून मुंडा, मनसुख मांडविया, नरोत्तम मिश्रा, केशवप्रसाद मौर्य आणि प्रल्हाद सिंह यांचा समावेश आहे.

बंगालमधील विविध भागांची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. शहा यांनी दिलेल्या सूचनेनुसार, या नेत्यांना बंगाली भाषा शिकावी लागणार आहे. याचबरोबर बंगाली संस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयीही आपल्याशा कराव्या लागणार आहे. बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा सामना तृणमूल कॉंग्रेसशी होत आहे. गैरबंगाली मुद्यावर तृणमूलकडून भाजपावर हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे आपल्या नेत्यांनी बंगाली संस्कृतीमध्ये मिसळून जावे, अशी रणनिती आखली जात आहे.

Team Amit Shah in Bengali colors, from language to eating habits

बंगालमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपाला बंगाली लोकांची मानसिकता समजून घ्यावी लागणार आहे. तरच त्यांची स्वीकारार्हता वाढणार आहे. त्यामुळे गेल्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वभारती विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या काही बंगाली कविता वाचून दाखविल्या होत्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*