वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबई पुन्हा धास्तावली, शिक्षकांना घरातूनच काम करण्याचे आदेश

विशेष  प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 17 मार्चपासून घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. Teachers will work from home in Mumbai

मुंबई महानगरपालिकेच्या परिसरात मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी यांचे हित लक्षात घेत शिक्षकांना पुढील आदेश जारी होईपर्यंत घरून काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


वर्षभरापासून पगार रखडलेल्या शिक्षकांचा आंदोलनाचा इशारा


मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षकांनी घरी राहून “ई-लर्निंग’ शैक्षणिक सुविधेनुसार आणि ऑनलाइन पद्धतीने अध्यापन करावे, घरातून काम करताना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामाची “गुगल शिट’ वा “वर्कशिट’मध्ये नोंदी कराव्यात, असे आदेश एका परिपत्रकातून दिले आहेत.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत धान्याचे वितरण करण्यासाठी शिक्षकांची शाळेत उपस्थिती आवश्य्क असल्यास त्यासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार मुख्याध्यापक वा शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात आले आहेत. तसेच एकाच दिवशी सर्व शिक्षकांना शाळेत बोलावू नये. ज्या वेळी आवश्यवक असेल अशा दिवशी शिक्षकांना शाळेत बोलावले जावे; मात्र त्यासाठी महत्त्वाचे कारण असावे, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Teachers will work from home in Mumbai

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*