मुळशी प्रकल्पातील पाणी पुणे शहरासाठी उपलब्ध; टाटांनी वीजनिर्मिती थांबवावी; अजित पवारांचे आवाहन


विशेष प्रतिनिधी

पुणे : देशात मुबलक वीजनिर्मिती होत आहे. त्यामुळे मुळशी धरण प्रकल्पातून वीजनिर्मिती थांबवावी. त्यामुळे पाणी पुणे शहरासाठी पिण्यासाठी उपलब्ध होईल, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टाटा पॉवरला केले. Tata should stop power generation at Mulshi dam plant: Ajit Pawarपुणे महापालिकेच्या भामा असखेड प्रकल्पातून पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे पवार यांनी उदघाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. मुळाशी धरणातून पुण्याला पाणी देण्याचा विचार सूरु आहे.

वीजनिर्मिती थांबली तर अतिरिक्त पाणी उपलब्ध होईल. सुमारे 5 ते 7 टीएमसी पाणी पुणेकरांना देता येईल. त्याद्वारे पिण्याच्या पाण्याची समस्या मिटू शकेल.

Tata should stop power generation at Mulshi dam plant: Ajit Pawar

ते म्हणाले, देशभरातील अनेक शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी रेल्वेने पाणी पुरवले जाते. पुणे विस्तारत असताना पाणी तेवढेच वाढले पाहिजे, या दृष्टीने आणि भविष्यातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी अशा योजनांची गरज आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी