वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्रात नवा मानबिंदू आज प्रस्थापित होत असतानाच या क्षेत्रात भारताला १.७५ लाख कोटींच्या निर्मितीचे उड्डाण करायचे आहे. येत्या ३-४ वर्षांत ते उद्दिष्ट भारत गाठेल, असा आत्मविश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला.target of Rs 1.75 lakh crores in the field of defence manufacturing: Defence Minister Rajnath Singh
त्याच बरोबर तेजस लढाऊ विमानांच्या वाटेकडे अन्य देशही डोळे लावून बसले आहेत. अन्य देशांनाही तेजस स्वतःच्या हवाई ताफ्यात हवे आहे. भारत त्यांच्या ऑर्डरही पूर्ण करेल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. हिंदुस्थान एरोनॉटिक्सच्या दुसऱ्या प्रॉडक्शन लाइनचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी बेंगळुरुमध्ये केले. त्यावेळी ते बोलत होते. हिंदुस्थान एरोनॉटिक्सला भारतीय हवाई दलाकडून ४८००० कोटींची तेजस एम १ लढाऊ विमानांची ऑर्डर मिळाली आहे. त्याचे उत्पादन या प्रॉडक्शन लाइनवर होणार आहे.
यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, की भारत इथून पुढे स्वतःच्या संरक्षणासाठी अन्य देशांवर अवलंबून राहणार नाही. संरक्षण उत्पादने देशातच तयार करण्यावर भर राहील. तेजस सारख्या दर्जेदार हलक्या वजनाच्या विमानांची अद्ययावत व्हर्जन भारत तयार करेल आणि जागतिक बाजारपेठेत त्यांची विक्री करेल. कोरोना सारख्या महामारीच्या काळात हिंदुस्थान एरोनॉटिक्सला संरक्षण दलाकडून मोठी ऑर्डर मिळाली. अजूनही ऑर्डर मिळत राहतील. एवढेच नाही तर अन्य देशही तेजस लढाऊ विमानांच्या उत्पादनाकडे लक्ष ठेवून आहेत. त्यांच्याही ऑर्डर लवकरच कंपनीला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तेजसच्या उत्पादनातून भारत हवाई संरक्षण क्षेत्रात नवी उंची गाठेल. त्याचबरोबर संरक्षण उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रातही मोठी झेप घेईल. यातून मेक इन इंडिया उत्पादनांची गुणवत्ता जगात स्थापित होईल, असेही राजनाथ सिंह म्हणाले.
I have been informed that several counties have expressed interest in procuring Tejas M1A and I assure you that you will get orders from other counties very soon: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/SdhRRtWcUO
— ANI (@ANI) February 2, 2021
तेजसची नवी व्हर्जन भारताच्या संरक्षण दलांच्या गरजांच्या बरोबरीने अन्य देशांच्या संरक्षणविषयक गरजाही पूर्ण करेल, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.
- स्वदेशी बनावटीचे तेजस
स्वदेशी बनावटीचे तेजस विमान केवळ स्वदेशी बनावटीचे म्हणून हवाई दलात समाविष्ट केलेले नाही. तर त्याची हवाई क्षमता आणि गुणवत्ता यावर आधारित त्याची निवड केली आहे. तेजसचा वेग, इंजिन क्षमता, हवेतून हवेत क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता, रडार सिस्टिम, बियाँड व्हिज्युअल जाऊन काम करण्याची क्षमता हे जागतिक मानांकनानुसार आहे. एवढेच नाही तर काही फिचर्स नवी जागतिक मानांकने प्रस्थापित करते म्हणूनही तेजस आज अद्ययावत लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. याची आठवण राजनाथ सिंह यांनी करवून दिली.