कोरोना रोखण्यासाठी जुन्या अनुभवांसह नवे उपाय करा; मायक्रो कंटेंनमेंट झोन बनवा; मोदींची मुख्यमंत्र्यांना सूचना

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले, आपल्याला भीतीचे वातावरण निर्माण करायचे नाही. Take new measures with old experiences to prevent corona modi to uddhav thackeray

मात्र काही दक्षता बाळगून काही बाबतीत पुढाकार घेऊन, आपल्याला जनेतला संकटातून बाहेर देखील काढायचे आहे. आपल्या जुन्या प्रयत्नांचा समाविष्ट करून आपल्याला नवे धोरण आखावे लागणार आहे. प्रत्येक राज्याचे विविध प्रयोग आहेत आणि चांगले प्रयोग आहेत. अनेक राज्ये अन्य राज्यांकडून नवनवीन प्रयोग शिकत आहेत. आता आपल्याला सक्रीय होण्याची आवश्यकता आहे.तसेच, जिथे आवश्यक आहे आणि हे मी आग्रहाने सांगतो की मायक्रो कंटेंनमेंट झोन बनवण्याच्या पर्यायत कोणत्याही परिस्थितीत हयगय होता कामा नये. यावर काम झाले पाहिजे. याशिवाय करोना लस वाया जाण्याचे प्रकार थांबवावे, असे देखील यावेळी मोदींनी सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बँनर्जी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल बैठकीत गैरहजर होते.

Take new measures with old experiences to prevent corona modi to uddhav thackeray

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*