खासदारपदाचा राजीनामा देऊन स्वप्न दासगुप्ता विधानसभेच्या रिंगणात, तृणमूल काँग्रेसला धक्का

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्यसभेचे भाजपचे खासदार स्वप्न दासगुप्ता यांनी पदाचा राजीनामा आज अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याकडे दिला. ते आता पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. Swapna Dasgupta resigns as MP, hits Trinamool Congress

पश्चिम बंगालमधील तारकेश्वर विधानसभा मतदार संघातून उमेदवार म्हणून रविवारी घोषणा करण्यात आली. त्यामुळे त्यांनी आज खासदारकीची राजीनामा दिला आहे.स्वप्न दासगुप्ता यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा होताच भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.

याचा सर्वाधिक धक्का तृणमूल काँग्रेसला बसला. नुकतेच निवडून आलेले राज्यसभेचे खासदार पदाचा राजीनामा देऊन कशी काय विधानसभेची निवडणूक लढऊ शकतात, असा प्रश्न तृणमूलने उपस्थित केला आहे.

Swapna Dasgupta resigns as MP, hits Trinamool Congress

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*