मुकेश अंबानींच्या अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळली; बडे उद्योगपती दहशतवाद्यांचे नवे टार्गेट??

वृत्तसंस्था

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील ‘अँटिलिया’ इमारतीजवळ गुरुवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक कार आढळली आहे. या कारमध्ये जिलेटिन कांड्या होत्या. suspected car at antilia mukesh ambanis residence in mumbai

अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य ‘अँटिलिया’ इमारत आहे. अँटिलियापासून जवळच काही अंतरावर एका स्कॉर्पियो कार उभी होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्या आहेत. पण यातून दहशतवाद्यांच्या टार्गेटवर बडे उद्योगपती आलेत काय?, याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील घटनास्थळावर पोहोचले आहेत.कारमधून जिलेटीन सदृश्य वस्तू ताब्यात घेतल्याचे गृहराज्यमंत्री शभूराजे देसाई यांनी सांगितले. अँटिलियाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. बॉम्ब निकामी करणारे पथक तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. ‘द फ्रि प्रेस जर्नल’ने हे वृत्त दिले आहे.

गाडीची नंबर प्लेट बनावट होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.वाहतूक पोलिसांनी ही स्कॉर्पियो ताब्यात घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

suspected car at antilia mukesh ambanis residence in mumbai

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*