सुशांतसिंह प्रकरणी बड्या ड्रग्स वितरकासह चौघांची चौकशी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी एनसीबीने चौघांची चौकशी केली. त्यात अमली पदार्थ वितरक करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, ऋषिकेश पवार व जगताप सिंग यांचा समावेश आहे. सजनानी व फर्निचरवाला दोघेही न्यायालयीन कोठडीत होते.Sushant Singh case Four including drug dealer interrogated

त्यांची पुन्हा चौकशीची परवानगी घेण्यात आली होती. एनसीबीने नुकतीच अटक केलेल्या जगताप सिंगला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. करण सजनानीकडून एनसीबीने २०० किलोचा गांजा जप्त केला.गांजा हर्बल प्रॉडक्‍ट असल्याचे दाखवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील रामपूर गावात एक युनिट सुरू करण्यात आले होते. तिथे गांजाचे पॅकेजिंग करून ते हर्बल प्रॉडक्‍ट असल्याचे दाखवण्यात यायचे. त्यामुळे एनसीबीचे उत्तर प्रदेशातील पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.

सजनानी हा हॉंगकॉंगमध्ये व्यवसाय करत होता. तेथे नुकसान झाल्यानंतर तो भारतात परतला. त्या वेळी त्याचा मित्र समीर खान याच्यासोबत १५ महिन्यांपूर्वी त्याचे बोलणे झाले.

त्या वेळीच सजनानीने हर्बल प्रॉडक्‍टच्या नावाखाली गांजा विकण्याचे ठरवले होते. तंबाखू, सीबीडी तेल व गांजा यांचे मिश्रण करून ते हर्बल प्रॉडक्‍ट म्हणून विकण्याचा त्याचा प्रयत्न होता.

Sushant Singh case Four including drug dealer interrogated

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*