सर्व्हे : जगात सर्वाधिक 80 टक्के भारतीयांना लस घेण्याची इच्छा, तर रशियन नागरिक लसीबाबत सर्वात अनुत्सुक

Survey: 80% of Indians in the world want to be vaccinated, while Russians are the most reluctant

भारतातील बहुतांश लोकांना कोरोनावरील लस घेण्याची इच्छा आहे. एडेलमन पीआरच्या ट्रस्ट बॅरोमीटर 2021च्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, 10 पैकी 8 भारतीयांना लस घेण्याची इच्छा आहे. हे सर्वेक्षण 28 देशांमध्ये करण्यात आले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश लोकांना कोरोनावरील लस घेण्याची इच्छा आहे. एडेलमन पीआरच्या ट्रस्ट बॅरोमीटर 2021च्या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, 10 पैकी 8 भारतीयांना लस घेण्याची इच्छा आहे. हे सर्वेक्षण 28 देशांमध्ये करण्यात आले. Survey: 80% of Indians in the world want to be vaccinated, while Russians are the most reluctant

दुसरीकडे, कोरोनाच्या लसीबद्दल रशियाचे नागरिक सर्वात जास्त नाखुश आहेत. कोविड -19 विरुद्ध स्पुतनिक-व्ही लस जाहीर करणारा रशिया पहिला देश होता. गतवर्षीच रशियामध्ये लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती.

ब्रिटन, जर्मनी, इटली, फ्रान्स, आयर्लंडसह युरोपियन देशांमध्येही कोरोना लसीबाबत लोकांनी मोठ्या प्रमाणात अनिच्छा व्यक्त केली आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, फ्रान्समधील केवळ 52 टक्के लोक लस घेण्यास तयार आहेत. त्याच वेळी अमेरिकेतील बहुतांश लोक लस घेण्यास अजिबात तयार नसल्याचे दिसून आले.

भारताने जगातील सर्वात मोठी ऐतिहासिक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या सर्व्हेकडे लक्ष दिले आणि या कामगिरीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय शास्त्रज्ञांना श्रेय दिले. भारत देशांतर्गत लसीकरण मोहीम राबवतानाच आपले शेजारी नेपाळ, भूतान, बांग्लादेश, मालदीव इत्यादी देशांना लसीचा पुरवठा करत आहे. भारताने लस उत्पादनाबरोबरच लसीच्या पुरवठ्यातही जागतिक पातळीवर आघाडी घेतली आहे.

Survey: 80% of Indians in the world want to be vaccinated, while Russians are the most reluctant

लस घेण्यास उत्सुक असलेले TOP-10 देश
1. भारत
2. ब्राझील
3. मेक्सिको
4. चीन
5. थायलंड
6. कोलंबिया
7. ऑस्ट्रेलिया
8. सौदी अरेबिया
9. अर्जेंटिना
10. यूएई

लसीसाठी अनुत्सुक TOP-10 देश
1. रशिया
2. दक्षिण आफ्रिका
3. फ्रान्स
4. जपान
5. सिंगापूर
6. स्पेन
7. नेदरलँड्स
8. नायजेरिया
9. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
10. जर्मनी

16 जानेवारीपासून भारताने लसीकरणाला सुरुवात केली आहे. भारतात आरोग्य क्षेत्रातील कर्मचार्‍यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. कर्नाटकात सर्वाधिक लसीकरण झाले आहे, येथे 1,82,503 जणांना लस देण्यात आली आहे. दुसरीकडे, ओडिशा 1,21,004 लसीकरणात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Survey: 80% of Indians in the world want to be vaccinated, while Russians are the most reluctant

भारताची लसीकरणातील आजपर्यंती प्रगती

भारतात लसीकरणाची मोहीम सुरू होऊन आता सहा दिवस उलटून गेले आहेत. या काळात एकूण 12.7 लाख लाभार्थींना कोरोनाची  लस देण्यात आली आहे. सातव्या दिवशी तब्बल 2,28,563 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत लसीकरणासाठी एकूण 24,397 कॅम्प लावण्यात आले. देशांतर्गत लसीकरणाबरोबरच शेजारील देशांनाही भारताने लसींचा पुरवठा केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था