पावसातले भिजणे आणि अस्थानी जोडणे…!!


  • कुठे २९० इल्टेक्ट्रोल वोटचा थम्पिंग विजय आणि आणि कुठे ५४ जागा… कशाचा कशाला मेळ तरी आहे काय…??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : काहींना नेत्यांना स्वतःच्या मूळ राजकीय साईजपेक्षा मोठी प्रतिमा दाखवायची हौसच असते. पण ही हौस अनेकदा फसते. तसेच काहीसे खासदार सुप्रिया सुळे (supriya sule news) यांचे झालेले दिसते आहे. तिकडे अमेरिकेत ज्यो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्याची बातमी आली आणि सुप्रिया सुळे यांनी पावसातल्या भिजण्याचे फोटो टाकून बायडेन यांच्या बरोबरच शरद पवारांचाही विजय साजरा करून घेतला. यालाच म्हणतात, “पावसातले भिजणे आणि अस्थानी जोडणे…!!”

कुठे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक… कुठे बायडेन यांचा २९० इलेक्ट्रोल वोटने जिंकण्याचा पराक्रम… आणि कुठे शरद पवारांनी पावसात भिजून महाराष्ट्रात मिळवलेल्या ५४ जागा… कशाचे कशाला, काही आकडे तरी जुळताहेत का…??… पण नाही… उचलले फोटो केले शेअर… आणि वरती कॉमेंट काय तर वय झाले म्हणून काय झाले…?

उत्साह तरूणांना लाजवणारा आणि जिंकणारा आहे. होय… बायडेन जिंकलेत, थम्पिंग मेजॉरिटीने. पवारांना पावसात भिजून मिळाल्यात ५४ जागा. त्यांनी महाराष्ट्रात सरकार आणलेय शिवसेनेशी जुगाड करून. बायडेन सरकार थम्पिंग मेजॉरिटीचे लोकांच्या मतांवर निवडून आलेले असेल. जुगाडू सरकार नसेल.

supriya sule news

एवढे करून ज्या राज्यात प्रचारसभेत बायडेन पावसात भिजले, त्या फ्लोरिडा राज्यात त्या भिजण्याचा इफेक्टच झालेला नाही. बायडेन यांना तेथे ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत. पण हे भिजण्याचे फोटो शेअर करणाऱ्यांच्या गावीही नाही. त्यांना फक्त शरद पवारांच्या भिजण्याशी बायडेन यांच्या भिजण्याशी तुलना करून पवारांचा तथाकथित विजय साजरा करायचाय…!!

पण त्यांचे हे पावसातले भिजणे आणि अस्थानी जोडणे नेटकऱ्यांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांच्या फोटो शेअरवर नेटकऱ्यांनी दणकूक विरोधी प्रतिक्रियाही व्यक्त केल्यात.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती