सुशांत मृत्यूप्रकरणी सीबीआयवर अहवाल देण्याची बंधन याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्युप्रकरणाचा तपास सीबीआयने लवकर करावा आणि त्याचा अहवाल सादर करावा अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.Supreme Court rejects CBI request to report Sushant rajput death

सरन्यायधीश एस. ए.बोबडे आणि ए.एस. बोपन्ना आणि न्यायधीश व्ही. सुब्रमण्यम यांच्या पीठाने याचिकाकर्ते पुनित कौर धंडा यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश देऊन सुनावणी करण्यास नकार दिला.१९ ऑगस्ट २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू राहत्या घरी संशयास्पद स्थितीत झाला. सुशांत यांचे लाखो चाहते हे मृत्युचे गूढ उकलण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे तपास वेळेत पूर्ण करावा.

चार महिन्यानंतरही सीबीआयच्या तपासातून काहीच बाहेर आलेले नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला तपास प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत.

सीबीआयला दोन महिन्याच्या आत तपास पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. कनिष्ट न्यायालयात अंतिम तपास अहवाल सादर करुन त्याची प्रत सर्वोच्च न्यायालयाला सादर करावी, असे याचिकेत म्हटले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.

Supreme Court rejects CBI request to report Sushant rajput death

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*