पुणे- नागपूर- पुणे मार्गावर सुपरफास्ट रेल्वेसेवा सुरू; आठवड्यातून तीन दिवस धावणार

वृत्तसंस्था

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या मागणीवरून पुणे – नागपूर मार्गावर आठवड्यातून तीनदा सुपरफास्ट रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. रविवार (ता. 7) पासून सायंकाळी 5.40 वाजता या सेवेला पुण्यातून प्रारंभ होत आहे. रविवार, मंगळवार आणि गुरुवारी या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल. रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता नागपूरला पोचेल.Superfast train service starts on Pune-Nagpur-Pune routeनागपूर येथून ही सेवा सोमवार, बुधवार आणि शनिवारी उपलब्ध आहे. सायंकाळी 6 वाजता रेल्वे सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी पुण्यात पोचेल.

प्रमुख थांबे

दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा आणि अजनी येथे रेल्वे थांबेल.

Superfast train service starts on Pune-Nagpur-Pune route

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*