स्यू की यांना दिली होती पाच लाख डॉलरची लाच, म्यानमारमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा खळबळजनक दावा

विशेष प्रतिनिधी

मंडाले : आपल्या व्यवसायाला मदत करण्यासाठी म्यानमारच्या नेत्या  आँग सान स्यू की यांना मी स्वत: पाच लाख डॉलरची लाच दिली होती, असा दावा म्यानमारमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक माँग वेक यांनी केला आहे. Sue Key was offered a 500,000 bribe

स्यू की या सध्या लष्करी राजवटीच्या ताब्यात आहेत. स्यू की यांच्या आईच्या नावे असलेल्या एका संस्थेत आपण हे पैसे भरल्याचा दावा वेक यांनी केला आहे. तसेच, इतर मंत्र्यांनाही लाच दिल्याची कबुली त्याने दिली आहे.स्यू की यांच्या समर्थकांनी मात्र आंदोलक आणि आंदोलनाच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी ही चाल रचल्याचा दावा केला आहे. वेक हा अमलीपदार्थांची तस्करी प्रकरणात दोषी असून त्याच्याकडून सत्याची अपेक्षा नाही, असे समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र, याआधारावर स्यू की यांच्यावर मोठे आरोप करून त्यांना तुरुंगात डांबून ठेवण्याचा लष्करी राजवटीचा इरादा असल्याचा आरोप होत आहे.

Sue Key was offered a 500,000 bribe

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*