स्तनांच्या कर्करोगावर कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाचे यशस्वी संशोधन ; संशोधनाला भारतीय पेटंट प्रदान


स्तनांच्या कर्करोगावर सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या फेरोसीफेन औषधाविषयी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाने यशस्वी संशोधन केले आहे. विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी केलेल्या या संशोधनाला पेटंटही मिळाले आहे. रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. गजानन राशिनकर आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही बहुमोल कामगिरी केली आहे. Successful research of Shivaji University in Kolhapur on breast cancer


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : महाराष्ट्रातच नाही तर देशात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. यावर जगभर संशोधन सुरु आहे.आता स्तनांच्या कर्करोगावर कोल्हापुरातल्या रसायशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. त्यामुळे कर्करुग्णांच्या वेदना कमी होण्यास आता मदत होणार आहे.

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात झालेलं संशोधन वेगळे आहे. शरीरातील सामान्य पेशींना अपाय न करता स्तनाच्या कर्करोगावर उपचार होऊ शकतात. या संशोधनाला भारतीय पेटंट देखील मिळालंय. डॉ. गजानन राशिनकर आणि डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही कामगिरी केली आहे. केमोथेरपी उपचारादरम्यान रुग्णांना औषधांच्या दुष्परिणामांना समोरं जावं लागतं. या संशोधनातून मात्र सामान्य पेशींना खूप कमी प्रमाणात धोका आहे.कर्करोगावरील केमोथेरपी उपचारामध्ये चांदी, सोने आणि प्लॅटिनम या धातूंना विशिष्ट गुणधर्मामुळं खूप महत्व आहे. पण या धातूंचा सामान्य पेशींवर देखील वाईट परिणाम होतात. कर्करोगावरील सध्याची औषधं सामान्य पेशी आणि कर्करोगाच्या पेशी यातला फरक ओळखण्यात कमी पडतात. त्यामुळं रुग्णांना औषधांच्या दुष्परिणामांना देखील सामोरं जावं लागतं. मात्र, आता झालेल्या संशोधनात हे दुष्परिणाम कमी करण्यात आले आहेत.

स्तनाचा कर्करोग हा जटील आजार आहे. त्यामुळे महिलांचा जागतिक मृत्यूदर देखील अधिक आहे. यावर उपचार करताना शरीरातील इतर पेशी मृत होत असतात. मात्र, या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या फेरोसीफेन औषधामुळं इतर पेशी वाचवता येणार आहेत. शिवाय नेमकेपणाने कर्करोगाच्या पेशी मारल्या जाणार आहेत. या दोन्ही शास्त्रज्ञांनी सलग सात वर्षे यावर काम करुन 2018 साली पेटेंटसाठी नोंदणी केली. विविध स्तरांवरील शास्त्रीय परिक्षणानंतर भारत सरकारनं 22 जानेवारीला पेटंट प्रमाणपत्र दिलं. त्यामुळं भविष्यात स्तनाच्या कर्करोगापासून होणारा महिलांचा मृत्यूदर काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

Successful research of Shivaji University in Kolhapur on breast cancer

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था