पहाटेच्या अजानमुळे सकाळी झोपमोड, अलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरूंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सकाळी मशिदीमध्ये होणाऱ्याअजानविरोधात अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूंनी लेखी तक्रार केली आहे. कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे सकाळी माझी झोपमोड होते अशी तक्रार करणारे पत्र प्रयागराजच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले आहे. Stop Ajan, Complaint of the Vice Chancellor of Allahabad University to the District Collector


विशेष प्रतिनिधी

अलाहाबाद : सकाळी मशिदीमध्ये होणाºया अजानविरोधात अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूंनी लेखी तक्रार केली आहे. कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे सकाळी माझी झोपमोड होते अशी तक्रार करणारे पत्र प्रयागराजच्या जिल्हाधिकाºयांना लिहिले आहे.

जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, पत्रामध्ये रोज पहाटे साडेपाच वाजता मशिदीमध्ये अजान होते. एवढ्या पहाटे होणाऱ्याअजानच्या आवाजमध्ये झोपमोड होते. माझी झोपमोड झाल्यानंतर मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला तरी मला पुन्हा झोप लागत नाही. अपुऱ्या झोपेमुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होत असल्याने याचा परिणाम कामकाजावर होत आहे.युवर फ्रिडम एंडस व्हेअर माय नोज बिगिन्स या इंग्रजी म्हणीचा संदर्भ श्रीवास्तव यांनी दिला आहे. समाजात राहताना वेगवेगळ्या पंथाचे लोकं एकमेकांवर कसे सांस्कृतिक आक्रमण करतात यासंदर्भात ही म्हण अनेकदा वापरली जाते. त्याचाच संदर्भ देत श्रीवास्तव यांनी हे पत्र एका विशिष्ट संप्रदाय, जाती किंवा वर्गाविरोधात नसल्याचे स्पष्ट केले. ते आपली अजान भोग्यांचा वापर न करताही करु शकतात. असे केल्याने इतरांचा दिनक्रम बाधित होणार नाही.

ईदच्या आधी तर पहाटे चार वाजताच या भोंग्यातून घोषणा केली जाईल. यामुळे सुद्धा मला आणि इतरांना त्रास सहन करावा लागणार आहे. भारतीय संविधानानुसार सर्व वगार्तील लोकांनी पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण मागार्ने रहावे असं म्हटल्याचे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे पत्रात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचाही उल्लेख करण्यात आलाय. २०२० साली करण्यात आलेल्या जनहित याचिका क्रमांक ५७० चा उल्लेख या पत्रात आहे.

श्रीवास्तव यांनी या पत्राची एक प्रत पोलीस आयुक्त, पोलीस महानिरिक्षक, पोलीस उप महानिरिक्षकांनाही पाठवली आहे. पोलीस उप महानिरिक्षक सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी काही दिवसांपूर्वी मला एक पत्र मिळालं असून या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं स्पष्ट केले आहे.

Stop Ajan, Complaint of the Vice Chancellor of Allahabad University to the District Collector

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*