राज्यांतील गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवली ; केंद्र सरकारकडून नवा आदेश जारी

वृत्तसंथा

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने कोरोना गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले. तसेच कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासही सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे.State guidelines limit extended to March 31 New order issued by the Central Government

केंद्र सरकारनं कोरोनाचे नवे गाइडलाइन्स 27 जानेवारीपासून लागू केले होते. कोरोना परिस्थितीवर लक्ष, कंटेनमेन्ट आणि खबरदारीबाबत आधी लागू असलेल्या या गाइडलाइन्सचं 31 मार्चपर्यंत पालन करावं, असे आदेश आहेत.कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक खबरदारी घ्या, प्रसंगी कठोर पावलं उचण्याच्या सूचनाही केल्या आहेत.महाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू होणार देशातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत.  गेल्या दोन दिवसांपासून दररोज 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

यावर राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला आहे.राज्यात कोरोना फोफावत असला तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. संपूर्ण लॉकडाउन नसला, तरी नागरिकांनी निर्बंध पाळावेत, मास्कचा नियम पाळावा यासाठी कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे.

 सध्या लोकल ट्रेनमध्ये कपात करणार येणार आहे. त्याचबरोबर, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेवून वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरही निर्बंध घालणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

राज्यातील परीक्षा ऑनलाइन घेता येतील का? याचा विचारही करत आहोत. जसं की तामिळनाडूमध्ये यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. महाराष्ट्रात परीक्षा घेण्याची गरज आहे का, यावर मतं घेवून विचार केला जात आहे. आम्ही सर्व शक्यतांवर विचार करत आहोत, त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.

State guidelines limit extended to March 31 New order issued by the Central Government

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*