फडणवीस, तावडे पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या परिवर्तन यात्रेला!!; ममतांचे पुतणे खा. अभिषेक बॅनर्जींच्या मतदारसंघात फडणवीसांचा निशाणा

प्रतिनिधी

डायमंड हार्बर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी शिक्षणमंत्री हे भाजपच्या केंद्रीय पातळीवर चमकताना दिसत आहेत. या दोन्ही नेत्यांना भाजपने पश्चिम बंगालच्या परिवर्तन यात्रेत सहभागी होण्यासाठी पाठविले आहे.

फडणवीसांनी आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर मतदारसंघात परिवर्तन यात्रेत सहभाग घेतला. या यात्रेला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. Started my rally PoribortonYatra from Amtala in Satgachia assembly constituency Diamond Harbour devendra fadnavis

विनोद तावडेही परिवर्तन यात्रेत अन्य मतदार संघांमध्ये सहभागी होत आहेत. तावडेंकडे राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांची ही पहिली निवडणूक आहे. त्यांच्याकडे हरियाणा राज्याचा कार्यभार आहे. परंतु, भाजपने पश्चिम बंगालची निवडणूक फार गांभीर्याने घेतली आहे त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांमधले उभरते नेते बंगालमध्ये परिवर्तन यात्रेत सहभागी होत आहेत.

देवेंद्र फडणवीसांकडे याआधी बिहारच्या निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी पक्षाने सोपविली होती. ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आता त्यांना बंगालच्या दौऱ्यावर परिवर्तन यात्रेत सहभागी होण्यासाठी पाठविण्यात आले आहे. फडणवीसांनी डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातील सत्गाचिया विधानसभा मतदारसंघात परिवर्तन यात्रेत सहभाग घेतला. त्याला जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

Started my rally PoribortonYatra from Amtala in Satgachia assembly constituency Diamond Harbour devendra fadnavis

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*